मुंबई : प्रतिनिधी : समृद्धी महामार्गानंतर आता शक्तीपीठ महामार्गाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी वक्तव्य कले आहे. समृदधी महामार्गानंतर आता आम्ही शक्तीपीठ महामार्गाकडे वळणार आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले तर उप मुख्यमंत्री शिंदे शक्तीपीठ महामार्ग मराठावाड्यासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा केला आहे. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी आणि राजकीय पक्षांचा जोरदार विरोध होत असतानाही सरकारने शक्तीपीठ महामार्ग दामटण्याचा निर्णय घेतला असल्याने पुढील काळात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. (Shaktipeeth Mahamarg)
महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई ते नागपूर अशा समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील इगतपुरी ते आमणे या ७६ किलो मीटर मार्गाचे लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उप मुख्यमंत्री शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला फडणवीस आणि शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्गाविषयी भाष्य केले. (Shaktipeeth Mahamarg)
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्यासाठी गेमचेंजर ठरणार आहे . या महामार्गामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात विकास होईल आणि तिथल्या आत्महत्याही थांबतील असा दावा केला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणालाही या महामार्गाचा फायदा होणार आहे असेही ते म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी आणि राजकीय पक्षाचा विरोध होत आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले. आम्ही समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले तेव्हा खूप विरोध झाला. काहींनी विरोध करणाऱ्यांना राजकीय ताकद दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला. आज त्या शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाही अशाच पद्धतीने लोकांच्या हिताचा ठरेल. (Shaktipeeth Mahamarg)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गाप्रमाणे शक्तीपीठ महामार्गही आम्हाला पुढच्या टप्प्यात करायचा आहे. हा शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणारा असणार आहे. त्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. असेही ते म्हणाले.
एकीकडे महायुतीने शक्तीपीठ महामार्ग होणार असा दावा केला असताना शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत. शक्तीपीठ महामार्ग कृतीसमितीच्या माध्यमातून या महामार्गाला विरोध होत आहे. खासदार शाहू छत्रपती, प्रतिक पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात जनआंदोलन करण्यात येत आहे. (Shaktipeeth Mahamarg)