बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दलित तरुणावर भयंकर अत्याचार करण्यात आले. वेटर म्हणून काम करत असलेल्या या तरुणाला काही कथित गोरक्षकांनी बोलावून घेतले. गाडीवर बसवले आणि एका ठिकाणी नेऊन त्याला जबर मारहाण केली. (Dalit youth beaten up)
रोहन संतोष पैठणकर (वय २१ वर्षे, रा. शामल नगर, शेगाव रोड, खामगाव) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
खामगावमधीलच घाटपुरी नाका परिसरातील दंडेस्वामी मंदिर परिसरात ही भयंकर घटना घडली. या घटनेचे दलित संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मारहाणीत रोहनचा एक डोळा निकामी झाला आहे. नाकाचे हाड मोडले आहे. (Dalit youth beaten up)
दरम्यान, योगायोगाने पोलीस गस्त वाहन घटनास्थळावर आले आणि जखमीला उपचारासाठी हलविण्यात आले. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रोहन एका हॉटेलमध्ये वेटर आहे. तो रात्री साडे अकराच्या सुमारास खामगाव बस स्थानकाजवळ मित्रांसोबत गप्पा मारत होता. यावेळी तिथे आलेल्या दोघांनी त्याला शहरातील बस स्थानक परिसरातून आपल्या वाहनाने जवळच्या मैदानात नेले. गाई चोरल्याचा आरोप करत त्याला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने अमानुष मारहाण करण्यात आली. अंगावरचे कपडेही फाडण्यात आले. त्याच्या अंगावर मोकाट गायी सोडण्यात आल्या आणि समाजकंटकांनी त्याचेही चित्रीकरण केले. (Dalit youth beaten up)
जखमी अवस्थेत पडलेल्या रोहनला पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती वरिष्ठाना देण्यात आली. रोहनने आई रेखा यांच्यासह शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गब्बू गुजरिवाल (रा. सजनपुरी, खामगाव), प्रशांत गोपाल संगेले (गांधी ले आऊट खामगाव) आणि रोहित पगारिया ( बालाजी प्लॉट, खामगाव) याच्या विरुद्ध ॲक्ट्रोसिटी तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना अटक केली असून, एकजण फरार आहे.
हेही वाचा :
आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बेंगलोर अन् हैद्राबादला चालले
वन अधिकाऱ्याकडे खजिना; दीड किलो सोने, दीड कोटी रोकड