Cow dung row: प्राचार्याच्या डोक्यातील शेणाचा प्रयोग

Cow dung row

नवी दिल्ली : उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी प्राचार्याच्या डोक्यातील शेणाची कल्पना येते. वर्गातील उष्णता कमी करण्यासाठी कॉलेजची वर्गातील त्या आतून सारवून घेतात. विज्ञानयुगात वावरणाऱ्या या प्राचार्याच्या डोक्यातील शेणाची, त्यातही गाईच्या शेणाची कल्पना व्हायरल होते आणि त्यांनाच शिंतोडे उडवून घ्यावे लागतात. (Cow dung row)

घडलं ते असं : दिल्लीत कडक ऊन आहे. पारंपरिक पद्धतीने भिंत (आता इथे काँक्रिटची भिंत असतानाही) शेणाने सारवली की उन्हाची तीव्रता कमी होते आणि आतील वातावरण थंड राहते, असा दावा करत लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्य प्रत्युष वत्सला यांनी भिंत आतून शेणाने सारवली आणि कडक उन्हात वर्ग ‘थंड’ करण्याचा प्रयत्न केला. आता हा प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे.

प्राचार्यांच्या केबिनच्या भिंतीला फासले शेण

प्राचार्यांची ही कृती विज्ञानविरोधी आणि अंधश्रद्धा पसरवणारी असल्याचा आरोप करत दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे (DUSU) अध्यक्ष रोनक खत्री यांनी प्राचार्य प्रत्युष वत्सला यांच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. गाईच्या शेणाने सारवल्यानंतर वातावरण थंड होत असेल तर तुमच्या केबिनमधील एसी काढा आणि भिंतही शेणाने सारवा असे म्हणत खत्री यांनी केबीनच्या भिंतीला शेण फासले. खत्री यांनी यावेळी तेथे उपस्थित स्टाफवर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कॉलेज प्रशासन भांबावून गेले. (Cow dung row)

शाश्वतता संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून वर्गाची भिंत गाईच्या शेणाने सारवल्याची सारवासारव प्राचार्यांच्यावतीने करण्यात आली. ज्यांना या प्रयोगाविषयी काही माहिती नाही ते अपप्रचार करत असल्याचा दावाही त्यांनी केला.

घरी प्रयोग करायला हवा होता : दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू

प्राचार्यांच्या कृतीबद्दल प्रतिक्रीया व्यक्त करताना दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी म्हटले आहे की, त्यांनी प्रथम त्यांच्या घरात किंवा कार्यालयात याचा प्रयोग करायला हवा होता.

‘‘मी त्याच्या वैज्ञानिक पैलूवर भाष्य करू शकत नाही कारण मी तज्ञ नाही. त्यांना जर हा प्रयोग महत्त्वाचा आहे असे वाटत असेल तर तो वर्गात करण्यापूर्वी त्या प्रथम त्यांच्या घरी किंवा कार्यालयात प्रयोग करू शकल्या असत्या,’’ असे श्री. सिंह यांनी ‘द हिंदू’ला सांगितले. (Cow dung row)

संघाचा अजेंडा चालवण्याचा डाव : एनएसयूआय

या घटनेबाबत विद्यापीठाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष खत्री म्हणाले, “प्राचार्यांना संशोधन करायचे असेल तर आधी ते तुमच्या घरी करा.” ‘एनएसयूआय’ने एका निवेदनात म्हटले आहे की, “लक्ष्मीबाई कॉलेजच्या प्राचार्याची नियुक्ती शैक्षणिक कर्तव्यांसाठी करण्यात आली होती. आरएसएसचा स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी नाही. त्यांची कृती म्हणजे संघाचा अजेंडा पुढे नेण्याचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, पायाभूत सुविधा आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.”

हेही वाचा :
‘आरएसएस’च्या खात्याचेही ऑडीट करा
 नागपुरात ५८० बोगस शिक्षक भरतीत कोट्यवधीचा चुना

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर