Congress Protest against ED: ‘आरएसएस’च्या खात्याचेही ऑडीट करा

Congress Protest against ED

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप करत काँग्रेसच्यावतीने ईडीविरोधात देशभर तीव्र निदर्शने करण्यात आली. (Congress Protest against ED)

कर्नाटकातही निदर्शने करण्यात आली. भाजप आणि आरएसएसला मोठ्या प्रमाणात देणग्या कशा दिल्या असा प्रश्न कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांनी उपस्थित केला. ‘‘केंद्र सरकारला काळा पैसा कुठे जात आहे किंवा मनी लाँडरिंग कुठे होत आहे हे शोधायचे असेल तर त्यांनी त्यांच्याच कार्यालयांवर छापे टाकावेत. आरएसएसची नवीन इमारत १५० कोटी रुपयांची आहे. त्यासाठी निधी कोण देते? ते सांगताहेत की ७५,००० स्वयंसेवकांनी पैसे दान केले आहेत. असे असेल तर ऑडिट होऊ द्या. भाजपने आरएसएसच्या खात्याचे ऑडिट करावे,’’ असे आव्हान खर्गे यांनी दिले.

कर्नाटकातही निदर्शने
प्रियांक खरगे म्हणाले, ‘‘जेव्हा जेव्हा मोदींची लोकप्रियता कमी होते, आर्थिक संकट येते किंवा मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातात तेव्हा केंद्र सरकार आयटी आणि ईडीचा मुद्दा उपस्थित करते. भाजप सत्तेत येऊन एक दशक झाले आहे; तरीही, ईडी प्रकरणांमध्ये ते कोणतेही आरोप सिद्ध करू शकलेले नाहीत.’’ (Congress Protest against ED)

मुंबईत निदर्शनावेळी पोलिसांशी झटापटीत वर्षा गायकवाड जखमी

काँग्रेसच्या वतीने बॅलार्ड पियर्ड येथील ईडीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची ताब्यात घेतले.
ईडीकडून सुडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस ईडी कार्यालयावर मोर्चा घेऊन जात होते. यावेळी पोलिसांनी खासदार गायकवाड आणि सहकाऱ्यांना धक्काबुक्की केली.यात त्यांच्या डोक्याला जखम झाली.इतरांची धरपकड करण्यात आली. महायुती सरकारने पोलि बळाचा वापर करून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला.पण काँग्रेस अशा कारवायांना घाबरत नाही व घाबरणार नाही. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्रीआणि मुंबई पोलिस आयुक्तांनी माफी मागावी तसेच सरकारने या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर करवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पाटण्यात ईडी कार्यालयावर धरणे

बुधवारी पाटण्यात वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली हजारो काँग्रेस पक्ष कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी ईडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या कारवाईविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाटण्यातही संपतप्त कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. (Congress Protest against ED)

नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजप राजकीय सूडबुद्धीने वागत आहे. हा प्रकार आम्ही कदापीही खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी दिला. ‘‘हा पूर्णपणे बनावट खटला आहे. असे खटले दाखल करून विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ब्रिटिश राजवटीनेही काँग्रेसवर असेच आरोप करण्यात आले. मात्र काँग्रेस अशा प्रकारांना पुरून उरली, असा दावाही अनेक नेत्यांनी यावेळी केला.

बिहार काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू म्हणाले की, आजचे निषेध आंदोलन आणि निदर्शने म्हणजे ‘भीती आणि दडपशाहीच्या राजकारणा’ विरोधात उभे राहण्याच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या सामूहिक संकल्पाची एक शक्तिशाली अभिव्यक्ती आहे.

‘‘ईडीच्या गैरवापरातून लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकाराविरोधात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बिहारचे लोक भाजपच्या हुकूमशाहीला योग्य उत्तर देतील,’’ असा दावाही कृष्णा यांनी यावेळी केला.

ते म्हणाले, ‘‘ईडी, सीबीआय आणि आय-टी सारख्या संस्था भाजपच्या खाजगी सैन्याप्रमाणे काम करत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. ईडीची भूमिका संविधानविरोधी आहे. लोकांना दर्जेदार आरोग्यसेवा आणि चांगले शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. बेरोजगारी आणि स्थलांतर रोखण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार नियंत्रित करण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. अश मुद्द्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच या एजन्सींचा वापर केला जात आहे.’’ (Congress Protest against ED)

काँग्रेसला भाजप-नितीश सरकार घाबरले

‘‘भाजपने कितीही प्रयत्न केले, कितीही एजन्सी वापरल्या तरी काँग्रेस पक्ष घाबरणार नाही किंवा झुकणार नाही,’’ असा इशारा बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राम यांनी दिला. भाजप प्रत्येक निवडणुकीपूर्वी ज्वलंत मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केंद्रीय तपास संस्थांचा वापर करत आहे. ते म्हणाले, ‘‘ मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी अशा युक्त्या लढवण्याची भाजपची जुनीच पद्धत आहे. बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विविध आघाड्यांवरील मोदी सरकारचे अपयश आम्ही अधोरेखित केले. आमच्या प्रचाराला मिळणारा भव्य प्रतिसाद पाहून भाजप-नितीश सरकार घाबरले आहे.’’

हेही वाचा :
नॅशनल हेराल्ड : नेहरू ते गांधी
अमित शहा महाराष्ट्रातील तीन पक्ष चालवतात

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर