माणिकराव कोकाटेंचा राजीनामा

Court orders the arrest of Minister Kokate

नाशिक : न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना अटक करण्याचे आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाकडून जोपर्यंत स्थगिती मिळत नाही तो पर्यंत अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान कोकाटे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने त्यांची मंत्रीपदावरुन हकालपट्टी केली. दरम्यान बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. कोकाटेंच्या जागी कुणाची वर्णी लागणार की त्यांच्या मंत्रीपदाचा पदभार दुसऱ्या मंत्र्याकडे देणार याकडे लक्ष लागले आहे.

नाशिक जिल्हा सत्र  न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. यानंतर सदनिका घोटाळाप्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांनी यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज युक्तिवाद होऊन न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. त्यानंतर या प्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर कोकाटेंना त्वरीत अटक करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. माणिकराव कोकाटे यांनी त्वरीत पोलिसांसमोर हजर व्हावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. (Court orders the arrest of Minister Kokate)

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केली होती. प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणात माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Court orders the arrest of Minister Kokate)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या