बालसंकुलात पूजाचा विवाह थाटामाटात

Pooja's wedding was celebrated grandly at Balasankul

कोल्हापूर : प्रतिनिधी : बालकल्याण संकुलातील डॉ. अहिल्यादेवी दाभोळकर महिला आधारगृहात बालपणापासून वाढलेल्या सर्वांच्या लाडक्या पूजा या कन्येच्या बालसंकुलातील पदाधिकारी आणि शहरातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या अनमोल मदतीने तिचा विवाह थाटामाटात झाला.

मंगळवार पेठेतील नंगीवली तालीम, पाण्याच्या खजिन्याजवळ अनाथ मुले आणि मुलींचा सांभाळ केला जातो. याच बालसंकुलातील पूजाचा भुदरगड तालूक्यातील खानापूर इथल्या विश्वजित यांच्याशी थाटामाटात विवाह सोहळा झाला. साताऱ्याच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील व ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील या दांपत्याने कन्यादान केले. भुदरगड तालुक्यातील खानापूर इथल्या विश्वजित यांच्याशी त्यांची लग्नगाठ बांधण्यात आली. (Pooja’s wedding was celebrated grandly at Balasankul)

विवाहसोहळ्यासाठी मंगळवारी दुपारपासून बाल संकुलात लगबग सुरू होती. संकुलाच्या दारात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. मांडव उभारण्यात आला होता. हलगीच्या तालावर बाल संकुलातील मुलं आनंदान नाचत होती. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी मान्यवरांची समारंभ स्थळी उपस्थिती होती. अंतरपाट धरला गेला, मंगलाष्टका सुरू झाल्या, मान्यवरांनी पुष्पवृष्टी करत नव वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. बाल कल्याण संकुलातील सुकन्या पूजा हिचा या सोहळ्यासाठी बालकल्याण संकुलात जय्यत तयारी करण्यात आली होती. ए वन डेकोरेशनचे निलेश चव्हाण यांनी मांडव, भव्य विद्युत रोषणाई केली होती. (Pooja’s wedding was celebrated grandly at Balasankul)

मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा झाला. विवाह सोहळ्यासाठी भास्कर भोसले डेकोरेशन यांनी स्टेज बांधले होते. वधू पूजाला पूनम प्रदिप कुंभार यांनी मंगळसूत्र दिले तर  द्वारकादास श्यामकुमार कापड दुकान यांच्याकडून वधू-वरासाठी लग्न बस्ता दिला आणि राजाराणी कपाट दिले. डॉ. प्रविण आणि योगिता कोडोलीकर यांच्याकडून वॉशिंग मशिन, नामिदेवी अनिल कश्यप यांच्याकडून सागवानी बेड, आराम गादी कारखाना यांच्याकडून गादी सेट, सचिन ग्लास ट्रेडर्सकडून भांड्याचा सेट, भारती मुद्रणायालयाकडून विवाह पत्रिका, राजगोंडा शेटे यांच्या कडून मंडप सजावट करण्यात आली. बापू आवळे यांनी हलगी पथकाने सोहळ्यात रंगत आली. (Pooja’s wedding was celebrated grandly at Balasankul)

दांपत्याला अशिर्वाद देण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, बालसंकुलचे सुरेश शिपुरकर, सचिव पद्मजा तिवले,  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे,  डॉ. सुनीलकुमार लवटे, व्यंकाप्पा भोसले, बाबा देवकर आदी उपस्थित होते.  

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर