Congress slams on NEP: मराठी अस्मितेवर घाला

Congress slams on NEP

मुंबई : पहिलीपासून हिंदीची सक्ती करून मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. (Congress slams on NEP)

नव्या भाषा धोरणात त्रिभाषा सूत्रानुसार, महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. पाठोपाठ काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही त्रिभाषा सूत्राला विरोध दर्शवला आहे.(Congress slams on NEP)

ते म्हणाले, संघराज्य निर्मिती वेळी भाषेला प्राधान्य देताना राज्यांची मातृभाषा मान्य केली गेली. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. इंग्रजीसह या दोन भाषा शिक्षण व प्रशासनात वापरल्या जातात. अशा परिस्थितीत तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने लादणे म्हणजे मराठीवर अन्याय आहे, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला आहे.

केंद्राकडून धमकी
तिसरी भाषा हवीच असेल, तर ती पर्यायी असावी. पण ती सक्तीची करणे हा एकप्रकारे केंद्रातून राज्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, जो संघराज्य व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना धरून नाही. काही राज्यांनी याला विरोध केला आहे आणि त्यांना धमकावले जात आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. मराठी अस्मिता आणि भाषिक अधिकार रक्षणासाठी ही सक्ती तत्काळ मागे घेतली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.(Congress slams on NEP)

हेही वाचा :
महाराष्ट्राचे ‘हिंदीकरण’ खपवून घेणार नाही
उर्दूचा उगम भारतातच

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग