Congress slams Modi: पंतप्रधानांना टॅरिफ हवा आहे, टॅरिफवर चर्चा नको : काँग्रेस

Congress slams Modi

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली. त्यासाठी व्यापारशुल्काचा वापर केल्याचा दावा खुद्द ट्रम्प यांच्याकडून वारंवार केला जात आहे. या दाव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र मौन बाळगले असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी (२९ मे) केला. (Congress slams Modi)

पंतप्रधान या प्रश्नावर गंभीर आर्थिक आणि राजनैतिक चर्चा करण्याऐवजी खुशामत करत फिरत असल्याचा आरोपही रमेश यांनी केला.

‘‘आपल्या पंतप्रधानांना व्यापारशुल्काबद्दल काहीही ऐकायचे नाही; त्यांना फक्त ‘तारीफ’ (स्तुती) ऐकायची आहे. म्हणून, पंतप्रधानांचे यावर मौन आहे. पंतप्रधान या प्रश्नावर काहीही बोललेले नाहीत,’’ असे रमेश म्हणाले.

व्यापार शुल्काची धमकी देऊन भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणल्याचे श्रेय ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर घेतले आहे. विशेषतः अमेरिका, सौदी अरेबिया आणि कतारमधील भेटीदरम्यान त्यांनी तशी जाहीर वक्तव्ये केली आहेत, असे रमेश यांनी निदर्शनास आणून दिले. (Congress slams Modi)

‘‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ११ दिवसांत ८ वेळा हे वक्तव्य ३ देशांमध्ये केले आहे. ही युद्धबंदी माझ्यामुळे झाली आहे. मी व्यापार शुल्काचा वापर केला आणि दोन्ही देशांना सांगितले आहे की जर तुम्ही युद्धबंदी केली नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापार शुल्क  वाढेल,’’ असे ते म्हणाले.

रमेश यांनी भारत आणि पाकिस्तानची बरोबरी करणाऱ्या ट्रम्प यांच्या विधानावरही चिंता व्यक्त केली. ‘‘त्यांनी (ट्रम्प) स्पष्टपणे म्हटले आहे की मी भारत आणि पाकिस्तानला एकाच मापात ठेवले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था १० पट वाढली आहे, परंतु दोघेही एकाच बोटीत आले आहेत.’’ हे ट्रम्प यांचे विधान जयराम रमेश यांनी उधृत केले.

ट्रम्प यांच्या विधानाचे खंडन भारत सरकारने का केले नाही, हे कसं होऊ शकतं?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Congress slams Modi)

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या मौनावरही त्यांनी निशाणा साधला आणि ट्रम्प यांच्या वक्तव्यावर त्यांनी किंवा पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला नाही, असा पुनरुच्चार केला.

पहेलगामप्रश्नी विशेष अधिवेशन घ्या

विरोधी पक्षांची वारंवार मागणी असूनही पहेलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष संसद अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक न बोलावल्याबद्दल त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

रमेश यांनी १० मे रोजी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रांचा संदर्भ दिला. तत्काळ राष्ट्रीय सुरक्षेच्या समस्या सोडवण्याऐवजी आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘‘आपल्या देशात २०१४ पासून अघोषित आणीबाणी लागू आहे. ५० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेसाठी ते विशेष अधिवेशन बोलावू इच्छितात? आजच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी ते जुने प्रश्न उकरून काढत आहेत,’’ असे ते म्हणाले.

हेही वाचा :
अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर
लालूपुत्राचे प्रताप ‘आरजेडी’च्या मुळावर

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर