Elon Musk: मस्क यांनी सोडली ट्रम्प यांची साथ

Elon Musk

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे उजवे हात समजले जाणारे एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांची साथ सोडली. राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार म्हणून ते काम पाहत होते. (Elon Musk)

‘‘विशेष सरकारी कर्मचारी’’ आणि ‘‘राष्ट्रपतींचे वरिष्ठ सल्लागार’’ म्हणून त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबादारी होती. ट्रम्प यांचे सर्वांत विश्वासू समर्थक म्हणून एलॉन मस्क यांनी अमेरिकन राजकारणावर अमिट छाप सोडली आहे.

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीच्या खर्च विधेयकावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या पहिल्या मोठ्या मतभेदानंतर, मस्क यांनी अमेरिकन सरकारमधील त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होत असल्याचे म्हटले आहे. मस्क यांना संघीय खर्च कमी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. (Elon Musk)

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या मस्क यांनी टेस्लाच्या माध्यमातून जागतिक उद्योग क्षेत्रावर मोठा ठसा उमटवला आहे.

२० जानेवारी रोजी श्री ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी जगातील सर्वांत श्रीमंत असलेल्या या व्यक्तीने नाट्यमयरित्या दोनवेळा आपला हात बाहेर काढत ट्रम्प यांचा उजवा हात असल्याचे दर्शवले होते.

हेही वाचा :
अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर
लालूपुत्राचे प्रताप ‘आरजेडी’च्या मुळावर

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर