पंतप्रधान निवास्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन ; राहूल, प्रियांकांचा ठिय्या

Congress protest outside the Prime Minister's residence

नवी दिल्ली : संसदेबरोबरच रस्त्यांवरच्या लढाईतही काँग्रेस उतरली असून नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहूल गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार प्रियांका गांधीही रणांगणात उतरल्या आहेत. गेली चार तास काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू असून राहूल गांधी यांनी ‘चलो पीएम हाऊस’ असा नारा दिला आहे. एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेरच आंदोलन सुरू केल्याने दिल्ली पोलिसांवर ताण आला आहे. (Congress protest outside the Prime Minister’s residence)

देशभर संतापाची लाट

कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील मोर्चावर पोलिसांनी अमानूष लाठीमार केल्याने देशभर संतापाची लाट पसरली आहे. मोठ्या महानगराबरोबर, शहरे, गावागावात नीट परीक्षाप्रश्नी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जनतेची साथ मिळू लागली आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाले असून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने रस्त्यांवरची लढाई सुरू केली असून राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर प्रतिकात्मक बेड्या घालून आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी खासदारांना ताब्यात घेतले आहे. नरेंद्र मोदी डाऊन, डाऊन…, पंतप्रधान मोदी इस्तिफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तिफा दो या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात काँग्रेसचे खासदार सहभागी झाले असून राहूल गांधी यांनी चलो पीएम हाऊस असे आवाहन केले आहे. तसेच आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Congress protest outside the Prime Minister’s residence)

मंत्री जितेंद्र प्रसाद राहूल गांधींच्या भेटीला

राहूल गांधी यांच्या आंदोलनाची दखल घेत मंत्री जिंतेंद्र सिंह यांनी राहूल गांधी यांच्या भेटीस आले. त्यांनी राहूल गांधी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण ते आंदोलनावर ठाम राहिले. त्यांनी जितेंद्र सिंह यांच्यासमोर पाच मागण्या ठेवल्या. त्यामध्ये केंद्रीय शिक्षण धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, आंदोलकावरील लाठीमाराची संपूर्ण चौकशी करावी, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर संसदेत सविस्तर चर्चा करावी, चर्चेच्यावेळी गृहसचिवांनी उपस्थित रहावे, गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व विषयावर भूमिका मांडावी अशा मागण्या केल्या आहेत. राहूल गांधी यांची भेट घेऊन जितेंद्र सिंह पंतप्रधानांना भेटण्यासाठी निवासस्थानी गेले आहेत.  (Congress protest outside the Prime Minister’s residence)

Related posts

‘लेम डक प्रेसिडेंट’सारखी मोदींची अवस्था ; राज ठाकरे यांचा हल्लाबोल 

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

पोलिसांनी राहूल गांधी, प्रियांका, अखिलेश यांना घेतले ताब्यात