मुंबई : मनसे आणि इतर मराठी संघटनांना मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र आयोजकांनी विशिष्ट मार्गाचाच आग्रहच धरला. पोलिसांनी या मार्गावर मोर्चासाठी परवानगी दिली असती तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (८ जुलै) व्यक्त केले. (CM on Marathi Morcha)
मोर्चासाठी शेजारच्या मीरा भाईंदर येथे होणाऱ्या रॅलीला परवानगी दिली आहे, परंतु पक्षाने कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या विशिष्ट मार्गावर आग्रह धरला, असे ते म्हणाले.
मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे यांनी, सरकार मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे घटना घडली तिथे मोर्चा काढण्याचा आमचा आग्रह होता. त्या मार्गावर परवानगी न देता पोलिसांनी घोडबंदरला मोर्चा काढण्याची सूचना केली. एखादी घटना नागपुरात घडली तर मुंबईत मोर्चा काढायचा असतो का, असा संतापही देशपांडे यांनी व्यक्त केला. (CM on Marathi Morcha)
मंगळवारी ठाण्यातील मीरा भाईंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या मोर्चापूर्वी पोलिसांनी मनसेचे ठाणे आणि पालघर प्रमुख अविनाश जाधव आणि इतर अनेक पक्ष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मराठी न बोलणाऱ्या एका खाद्यपदार्थ विक्रेत्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठी संघटनांनीही मोर्चा आयोजित केला होता.
मोर्चाला परवानगी न दिल्याबद्दल सरकारवर टीका करत निदर्शकांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. (CM on Marathi Morcha)
मीरा भाईंदर भागात मराठी एकीकरण समितीने हा मोर्चा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेचे कार्यकर्ते राज्यातील व्यावसायिकांनी आणि बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा, आग्रही आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘रॅली काढण्यास कुणाचाही विरोध नाही. मागितलेल्या मार्गाला परवानगी देणे कठीण होते. पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली, परंतु आयोजक एका विशिष्ट मार्गावर ठाम होते.’’ (CM on Marathi Morcha)
‘‘संयोजकांच्या आग्रहामुळे संबंधित मार्गावर वाहतूक किंवा चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, पोलिसांनी संयोजकांना त्यांना समजावून सांगितले, पर्यायी मार्ग देण्याचा प्रयत्न केला. आपण लोकशाहीत आहोत, प्रत्येकाला रॅली काढण्याचा अधिकार आहे,’’ असेही ते म्हणाले.
‘‘जर त्यांनी योग्य मार्गासाठी परवानगी मागितली तर आम्ही आज आणि उद्याही परवानगी देऊ. दुसऱ्या संघटनेने पोलिसांनी मंजूर केलेल्या मार्गावरून रॅली काढली, परंतु हे लोक एका विशिष्ट मार्गावर ठाम राहिले,’’ असे ते पुढे म्हणाले.
घटनाक्रमाचा संदर्भ देताना फडणवीस यांनी, संयोजकांनी सोमवारी रात्री उशिरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगी मागितली गेली होती, जी मंजूरही करण्यात आली, असे स्पष्ट केले.
हेही वाचा :
मीरा भाईंदर मोर्चात मराठी माणसांची धरपकड
कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही : अशिष शेलार