Child dies of heart disease : दहा वर्षाच्या मुलाचा आईच्या मांडीवरच हृदयविकाराने मृत्यू

Child dies of heart disease

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या मंडपात तो मित्राबरोबर खेळला आणि दमून घरी आला. आईच्या कुशीत विसावला आणि त्याचा हृदयविकाराचा तीव्र झटका आला. आई थोपटत असताना मांडीवर झोपलेल्या मुलाचा मृत्यू झाला. आईने त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. तिने आक्रोश सुरू केला. डॉक्टरांना बोलावले. पण त्यांनी त्याला मृत घोषीत केले. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात घडली. (Child dies of heart disease)

दहा वर्षीय श्रावण गावडे मित्रासमवेत मंडप खेळत होता. त्याला अस्वस्थ झाल्याने घरी आला. आईला त्याने मला गरगरतय असे सांगितल्यावर तो आईच्या कुशीत शिरला. आईने त्याला मांडीवर झोपवत केसावर हात फिरवत त्याला थोपटले. पण त्याची हालचाल बंद झाली. तो बोलोनासा झाला. आईने ‘श्रावण उठ’ म्हणून धावा केला. पण तो उठेना. त्यांच्या तोंडावर पाणी मारले. गदागदा हलवले. घरची सगळी आली. प्रत्येक जण त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण तो उठलाच नाही. सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. डॉक्टरांना बोलावले. त्यांनी तपासले. पण तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने त्याला काळाने गाठले होते. आईने हंबरडा फोडला आणि कोडोली गाव हळहळून गेले. गावडे कुटुंबिय दु:खाच्या शोकसागरात बुडाले. (Child dies of heart disease)

मुलीनंतर मुलाचा मृत्यू

गावडे कुटुंबावर चार वर्षात दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला. चार वर्षापूर्वी श्रावणच्या बहिणीचे निधन झाले होते. आता श्रावणचा दुर्दर्वी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबाला या संकटातून सावरताना कठीण झाले आहे.  (Child dies of heart disease)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर