महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य विधानसभेची आज (दि.२६) मुदत संपत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला. यावेळी नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार पाहण्यास सांगितले. (Eknath Shinde)
आज (दि.२६) सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन भेट घेऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपालांनी एकनाथ शिंदेंचा राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री
चौदाव्या विधानसभेचा कालावधी संपुष्टात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या पदाचा व मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.
चौदाव्या विधानसभेचा कालावधी आज संपुष्टात आला. त्यामुळे हे सभागृह बरखास्त झाले आहे. निवडून आलेल्या सदस्यांकरवी नवीन सभागृह अस्तित्वात येईल. नव्या सरकारचा शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. (Eknath Shinde)
हेही वाचा :