मुंबई : विशेष प्रतिनिधी : सातत्याने वादग्रस्त कृत्य आणि वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ऐन पावसाळी अधिवेशन सुरु असताना त्यांनी आमदार निवासातील कँटिन कर्मचाऱ्याला मंगळवारी (८ जुलै) रात्री बेदम मारहाण केली. शिळे आणि निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याने संताप अनावर झाल्याने ते बनियन आणि टॉवेल गुडाळलेल्या अवस्थेत कँटीनमध्ये अवतरले आणि संबंधित कर्मचाऱ्याची त्यांनी धुलाई केली. (Canteen employee beaten)
गायकवाड यांच्या या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याबाबत विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आमदार गायकवाड यांनी मंगळवारी (८ जुलै) आमदार निवासातील कँटीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली होती. त्यांना जेवण देण्यात आले. परंतु, त्यांच्या ताटातील भात आणि वरण शिळ होते. त्याचा वास येत होता, असा आक्षेप घेत गायकवाड यांचा संताप अनावर झाला. त्यांनी बनियन व टॉवेल गुंडळल्याच्या अवस्थेत आपल्या सहकार्यासमवेत थेट कँटीनमध्ये गेले. त्याच्या व्यवस्थापकाला फैलावर घेतले. कर्मचाऱ्याला बोलावून त्याला कानशिलात लगावली. चेहरा आणि पोटावर ठोसे मारले.(Canteen employee beaten)
व्हिडिओ व्हायरल
पावसाळी अधिवेशनासाठी गायकवाड सध्या मुंबईत आहेत. आकाशवाणी आमदार निवासात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. येथील कँटीनमध्ये त्यांना खराब जेवण मिळाल्याचे कारण पुढे करत त्यांनी जोरदार राडा घातला. गायकवाड यांनी कँटीनच्या कर्मचाऱ्याला थेट बुक्क्यांनी मारहाण केली. कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली आणि ठोसे मारले. या गडबडीत तो खाली पडला. त्यानंतर गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांने त्यांना बाजूला काढून कर्मचाऱ्याला मारहाण करीत चोप दिला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून गायकवाड यांच्या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Canteen employee beaten)
तक्रारी करूनही सुधारणा नाही : गायकवाड
आमदार निवासस्थानातील कँटीनमधील निकृष्ट जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार दिली आहे.तरीही त्यात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे शेकडो नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. कर्मचाऱ्याला त्याचा जाब विचारत आपल्या स्टाईलने धडा शिकवला. ही सभागृहाच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले.
हेही वाचा :
गुजरातमध्ये पूल कोसळला; आठ जणांचा मृत्यू
हवाई दलाचे जॅग्वार विमान कोसळले