Nationwide strike impact: देशव्यापी संपामुळे वाहतूक विस्कळीत

Nationwide strike impact

नवी दिल्ली : देशव्यापी संपामुळे महाराष्ट्रासह विविध भागातील वाहतूक विस्कळीत झाली. केंद्र सरकारची कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणे श्रीमंत-गरिबांतील दरी वाढवत आहेत. भांडवलशाहीधार्जिणे धोरण राबविल्यामुळे मूलभूत गरजा भागवणेही मुश्किल झाले आहे, असा आरोप करत देशातील कामगार संघटनांच्या मंचाने पुकारलेल्या बंदमुळे विविध सेवांवर परिणाम झाला. (Nationwide strike impact)

मुंबईतील बँक कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात सहभाग घेत निदर्शने केली. महाराष्ट्रासह झारखंड, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांसह देशात सर्व ठिकाणी कामगार संघटनांनी निदर्शने, मोर्चे आणि धरणे आंदोलन केले.

विविध भागात सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली. कारण दहा केंद्रीय कामगार संघटनांनी (सीटीयू) पुकारलेल्या भारत बंददरम्यान तीव्र निदर्शने करण्यात आली. कामगारांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध पुकारलेल्या संपाच्या १७ कलमी मागण्यांच्या सनदेला पाठिंबा दिला आहे.

केरळमध्ये बंदमुळे खाजगी आणि सार्वजनिक माल आणि अवजड वाहतूक तसेच लांब पल्ल्याच्या सेवा जवळजवळ ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे संपाच्या चक्रात अडकलेल्या शेकडो प्रवाशांची गैरसोय झाली. ज्यात अल्पवयीन मुलांसह महिलांचे हाल झाले. राज्यातील रेल्वे स्थानक आणि विमानतळावरील सेवेवरही परिणाम झाला. (Nationwide strike impact)

दरम्यान, या संपात आरएसएस समर्थित भारतीय मजदूर संघ (बीएमएस) सह सुमारे २१३ संघटना देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभागी होणार नाहीत, असा दावा केंद्रीय कामगार मंत्रालयाने केला आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या एका संघटनेने सांगितले की, बँकिंग क्षेत्र देखील देशव्यापी संपात सामील होईल.

म्हैसूरमधील औद्योगिक उत्पादनावर परिणाम नाही

म्हैसूरमधील औद्योगिक उत्पादनावर कोणताही परिणाम झाला नाही, परंतु केंद्राने तयार केलेल्या चार कामगार संहितांवर संपादरम्यान प्रकाश टाकण्यात आला.

९ जुलै रोजी जॉइन कमिटी ऑफ ट्रेड युनियन्स (JCTU) ने पुकारलेल्या देशव्यापी सार्वत्रिक संपाचा शहरातील आणि म्हैसूरमधील औद्योगिक क्षेत्रातील सामान्य जीवनावर अंशत: परिणाम झाला. (Nationwide strike impact)

म्हैसूरमध्ये, विविध कामगार संघटनांचे नेते आणि AIUTUC, CITU आणि AIKMS मधील असंख्य कार्यकर्त्यांनी कर्नाटक आणि केंद्रातील सरकारविरुद्ध घोषणा देत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून मोर्चा काढला.

सीपीआय (एम) चे जगदीश सूर्या म्हणाले की, संपाचा उद्देश सरकारला आणि ज्या राज्यांमध्ये कामगार संघटना शक्तिशाली आहेत त्यांना एक मजबूत संदेश देणे हा आहे. संपाचा मोठा परिणाम दिसून आला.

आसाममध्ये कामगारांची निदर्शने

केंद्र सरकारच्या कथित ‘कामगारविरोधी’ धोरणांना विरोध करण्यासाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या समर्थनार्थ चहा बागायतदारांसह अनेक संघटनांच्या सदस्यांनी राज्यभर निदर्शने केली. (Nationwide strike impact)

जवळजवळ सर्व वाहतूक कामगार संघटनांच्या राज्य युनिट्सनी संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक क्षेत्र ठप्प झाले आहे. बस आणि ट्रकसह व्यावसायिक वाहने बंद ठेवण्यात आली. स्कूल बस आणि आपत्कालीन सेवांवर परिणाम झाला नाही.

हेही वाचा :
निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी रस्त्यांवर
गुजरातमध्ये पूल कोसळला; आठ जणांचा मृत्यू

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर