CM on Gaikwad आ. गायकवाड यांच्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले…

CM on Gaikwad

मुंबई : विशेष प्रतिनिधी : आमदार निवासातील कँटीन कर्मचाऱ्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीचे पडसाद बुधवारी (९ जुलै) विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. (CM on Gaikwad)

विधानपरिषद सदस्य आणि शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब यांनी संजय गायकवाड यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडीओ पाहिला. अशाप्रकारचे वर्तन विधीमंडळ सदस्यास भूषणावह नाही. यामुळे विधिमंडळाची प्रतिष्ठा, प्रतिमा कमी होते. आमदार निवासात सोयी-सुविधा नाहीत, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे. अशावेळी तक्रार करावी, पण लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे चुकीचे आहे. विधिमंडळ अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.” (CM on Gaikwad)

दरम्यान, ‘‘मी गेल्या ३० वर्षांपासून आकाशवाणी कॅन्टीनमध्ये येत आहे आणि साडेपाच वर्षांपासून इथे राहतो. मी त्यांना चांगले जेवण देण्याची वारंवार विनंती केली आहे. अंडी १५ दिवसांची, मांस १५-२० दिवसांचे, भाज्या २-४ दिवसांच्या अशी येथे परिस्थिती असते. जवळजवळ ५,०००-१०,००० लोक येथे जेवण्यासाठी येतात. प्रत्येकजण येथील जेवणाबाबत तक्रार करत असतो. कुणाच्या जेवणात पाल असते, कुणाच्या जेवणात उंदीर किंवा दोरी असते,’’ असा आरोप आ. संजय गायकवाड यांनी केला. (CM on Gaikwad)

‘‘मी काल रात्री १० वाजता जेवण ऑर्डर केले आणि पहिला जेवण घेतल्यानंतर मला काहीतरी गडबड आहे असे वाटले. त्याचा वास आल्यानंतर मला ते शिळे असल्याचे लक्षात आले. मी खाली गेलो. व्यवस्थापकाला विचारले. मी सर्वांना अन्नाचा वास घ्यायला लावला. सर्वांनीच ते शिळे असल्याचे सांगितले. मी त्यांना पुन्हा समजावून सांगितले की त्यांनी स्वच्छ आणि चांगले अन्न द्यावे, विषारी अन्न खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यांनी तरीही ऐकले नाही, तर त्यांना समजावून सांगण्याची माझी स्वतःची पद्धत आहे,’’ अशी प्रतिक्रिया आ. गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा :
आ. गायकवाडांकडून कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण
गुजरातमध्ये पूल कोसळला; आठ जणांचा मृत्यू

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार