Breakfast meeting between Siddaramaiah and Shivakumar : सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात ब्रेकफास्ट मिटींग

Breakfast meeting between Siddaramaiah and Shivakumar

बेंगळुरू : कर्नाटकातील सत्तासंघर्ष उफाळला असताना आज शनिवारी नवीन नाट्य पहायला मिळाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरी उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी भेट घेऊन दोघांनी ब्रेकफास्ट केला. आम्ही दोघेही एकत्रित आहोत आणि हायकमांडांच्या आदेशाचे पालन केले जाईल असे दोघांनी पत्रकार परिषदेत सांगितले. २०२८ ची विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्धारही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडून जोरदार लॉबिंग

कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उप मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार लॉबिंग सुरू आहे. भाजपचा पराभव करुन काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत संघर्ष टाळला. पण आता अडीच वर्षानंतर शिवकुमार यांचा गट मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक झाला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री या दोघांचे गट प्रयत्न करत आहेत. त्यातच उप मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला आहे. पण आज शनिवारी सकाळी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची भेट घेऊन नाष्टा केला. काँग्रेस हायकमांडने दोन्ही नेत्यांना एकत्र बसून वाद मिटवण्यास सांगितल्यानंतर ही बैठक झाली असल्याचे समजते. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले. (Breakfast meeting between Siddaramaiah and Shivakumar)

हायकमांडोंच्या आदेशाचे पालन करणार

पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले,  ” आम्हाला गोंधळ संपवायचा आहे. आमच्यादृष्टीने  स्थानिक निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत आणि २०२८ च्या निवडणुकांसाठी आम्ही काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्यात आणि डीकेएसमध्ये कोणतेही मतभेद  आता नाहीत, पूर्वीही नव्हते . ” माध्यमांनी गोंधळ केला आहे पण आम्ही दोघे हायकमांडोंच्या आदेशाचे पालन करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. ८ डिसेंबरपासून सुरू होणारे विधानसभेचे अधिवेशन सुरळीत पार पडेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (Breakfast meeting between Siddaramaiah and Shivakumar)

हायकमांडांनी सांगितले तर मी थांबेन

शिवकुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या मताचे समर्थन करत म्हणाले, “लोकांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे आणि आम्हाला मोठा जनादेश दिला आहे. कर्नाटकातील जनतेला काम देणे हे आमचे कर्तव्य आहे, सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. लोकांना काँग्रेसवर विश्वास आहे. आम्हा दोघांनाही आमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. हायकमांडचा एकच शब्द – जर त्यांनी मला थांबायला सांगितले तर मी थांबेन. हायकमांड जे काही सांगेल ते आम्ही दोघेही पाळू.”

कर्नाटकात काँग्रेस मजबूत ठेऊ

ते पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री काहीही म्हणोत, मी त्यांच्याशी सहमत आहे. आम्ही बाहेरील लोकांना हस्तक्षेप करू देणार नाही.” शिवकुमार म्हणाले की सिद्धरामय्या लवकरच त्यांच्या घरी दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी येतील, आम्ही २०२८ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली. आम्ही पक्षाचे निष्ठावंत सैनिक आहोत. आम्हाला माहिती आहे की पक्ष राष्ट्रीय स्तरावर कठीण परिस्थितीत आहे, परंतु आम्ही कर्नाटकात तो मजबूत ठेवू,” असे ते म्हणाले. (Breakfast meeting between Siddaramaiah and Shivakumar)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर