दिल्ली : प्रतिनिधी : गडचिरोलीतील आश्रमशाळेत संर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने विद्यार्थीनींच्या मृत्यूवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे. अदिवासी बांधवांनी आता जंगलातील साप, विंचू पकडून मंत्र्यांच्या घरात तसेच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर सोडावेत. तेव्हा त्यांना मृत्यूचे भय काय असते ते समजेल’ असा हल्लाबोल केला. (Tribals should release snakes at Varsha Bungalow)
अदिवासींचा निधी कोण खातो?
मुलींच्या मृत्यूप्रकरणी संजय राऊत यांनी अदिवासी मंत्रालयाला लक्ष्य केले. शासकीय आश्रमशाळांची अवस्था अतिशय भयंकर आहेत. मुलींना झोपायला साधे बेड नाहीत. त्यामुळे त्या खाली झोपल्या आणि त्यांना सर्पदंश झाला. राज्याचे मुख्यमंत्री आणि अदिवासी विकास मंत्री काय करत आहेत?. अदिवासींच्या विकासासाठी आलेला निधी नेमका कुठे जातो?, कोण खातो? असा सवाल करत आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशा घटना घडतात. पण त्या रेकॉर्डवर येऊ दिल्या जात नाहीत असा आरोप केला.
दीड वर्षात खाण मालकांच्या गाड्याखाली १५० ठार!
गडचिरोलीतील खाण उद्योगावर टीका करताना राऊत म्हणाले, गडचिरोलीतील स्टील सिटी उभारण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षात खाण मालकांच्या हजारो गाड्याखाली चिरडून १५० हून अधिक अदिवासींचे बळी गेले आहेत. त्याच्या मृत्यूची नोंद होत नाही असा दावाही त्यांनी केला. एकादा अदिवासी ट्रकखाली चिरडून मेला तर खाणमालकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून पाच मिनिटात अपघातातील मयताची बॉडी गायब केली जाते. पाण्याचे फवारे मारुन रक्त साफ केले जाते. तेथील जिल्हाधकारी, पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी खाण मालकांकडून महिन्याला कोटींचे हप्ते खात आहेत असा आरोप केला.
नक्षलवाद अदिवासींसाठी संपवला की उद्योगपतीसाठी असा सवालही त्यांनी केला. भाजपचे देणगीदार आणि उद्योगपतींचे सरंक्षण करण्यासाठी नक्षलवाद संपवण्याची भाषा केली जात आहे. अदिवासींच्या नद्या, डोंगर, जंगले उद्धवस्त करण्याचा परवाना उद्योगपतींना दिला आहे असा आरोपही त्यांनी केला. (Tribals should release snakes at Varsha Bungalow)
कुठे झाला सर्पदंश?
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील कुप्पा लिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या अनुदानित अदिवासी आश्रमशाळेच्या वसतीगृहात ९ ऑगस्टच्या मध्यरात्री दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास विषारी सापने दंश केल्याने तीन विद्यार्थींनीचा दुर्दवी मृत्यू झाला. तसेच तीन मुलींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आश्रमशाळेत पुरेशे बेड नसल्याने मुली जमिनीवर झोपल्या होत्या. तिथे त्यांना दंश झाला. सुश्मिता सरोजित मंडल (वय १४), दीपिका एतवा लकडा (वय १२), अनु गजुराम कोरेटी (८) अशी मृत्यूमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत. तर दीपिका बिटलूरसाय मडावी (११), समृद्धी सुरेश नैताम (१४), कविता राजकुमार किरंगा (१२) यांची प्रकृती गंभीर आहे. (Tribals should release snakes at Varsha Bungalow)


