Home » Blog » अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

by प्रतिनिधी
0 comments
Rigorous imprisonment for the molester of a minor girl

कोल्हापूर : प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.आदोने यांनी सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. राहूल अशोक भोसले (वय ३७, रा. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना २०२४ मध्ये घडली होती. (Rigorous imprisonment for the molester of a minor girl)

आरोपी राहूल भोसले हा विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चालक होता. २७ सप्टेंबर २०२४ रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने असा प्रकार तीन वेळा केला होता. त्यामुळे पिडीत विद्यार्थीनी शाळेस जाण्यास नकार देत होती. पिडितेच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारला असता तीने आरोपींने केलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी भोसले याला बेड्या ठोकल्या. पोलिस उप निरीक्षक महेश कोंडूभैरी यांनी तपास करुन आरोपपत्र कोर्टात दाखल केले. (Rigorous imprisonment for the molester of a minor girl)

जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.अदानो यांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी नऊ साक्षीदार तपासले. पिडितेची आई, पिडीतेची काकी, शाळेच्या वर्गशिक्षिका यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी केलेल्या युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने राहूल भोसले याला पोक्सो कायदाअंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाच्या रक्कमेपैकी सात हजार रुपये नुकसान भरपाई पिडित मुलीला देण्याचा आदेश दिला. (Rigorous imprisonment for the molester of a minor girl)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!