Home » Blog » कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा

by प्रतिनिधी
0 comments
CM's major announcement regarding loan waivers

मुंबई : प्रतिनिधी : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. पूर्वीच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेतील ५० हजारांची मर्यादा आणि कर्ज परतफेडीचे जाचक नियम रदद केले आहेत. थकीत आणि नियमित कर्ज भरणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. (CM’s major announcement regarding loan waivers)

शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रविकांत तुपकर, अजित नवले यांनी आंदोलन केले होते. सभागृहात रोहित पवार, जयंत पाटील, बच्चू कडू यांच्यासह आमदारांनी आवाज उठवला होता. आज मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत नवीन घोषणा केली आहे. (CM’s major announcement regarding loan waivers)

नवीन घोषणेमुळे पूर्वीच्या योजनेनुसार फक्त ५० हजार रुपयांपयंत मिळणणरा लाभ आता दोन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. जाचक अटी रदद करण्यात आल्या आहेत. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्याच्या घोषणेचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. (CM’s major announcement regarding loan waivers)

You may also like

error: Content is protected !!