Home » Blog » राहूल गांधींच्या चॅलेंजमुळे अमित शहांचे हात थरथरत होते

राहूल गांधींच्या चॅलेंजमुळे अमित शहांचे हात थरथरत होते

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi's challenge made Shah's hands tremble

नवी दिल्ली : लोकसभेत एसआयआर चर्चेत राहूल गांधींनी अमित शहांना खुले आव्हान दिल्यावर अमित शहा यांनी माझ्या भाषणाचा मी निर्णय घेईन असे उत्तर दिले. त्यावेळी अमित शहांनी चुकीचे शब्द उच्चारले. त्यांचे हात थरथरत होते, असे राहूल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले.

काल बुधवारी लोकसभेत मतदार यादी सुधारणा या विषयावर अमित शहा भाषण करत असताना विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांना आव्हान दिल्याने सभागृहात वातावरण तापले होते. अमित शहा यांनी राहूल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून वारंवार होणाऱ्या मतचोरीच्या दाव्यावर अमित शहा यांनी जोरदार टीका केली. राहूल गांधी यांनी मतचोरी संबधित घेतलेल्या तीन पत्रकारांमध्ये उपस्थित केलेल्या आरोपांची सर्व उत्तरे आहेत, असे प्रत्युत्तर दिले. अमित शहा भाषणात म्हणाले, एसआयआर ही मतदान यादी साफ करण्याची प्रक्रिया आहे. तरीही त्याला विरोध होत आहे. तुमचा पराभव निश्चित आहे. मतदार यादीच त्याच्याशी काहीही संबध नाही. लोकशाहीत दुहेरी निकष चालणार नाही. जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा निवडणूक आयोग महान असतो. जेव्हा तुम्ही हरता निवडणूक पक्षपाती असतो. तुम्ही घेतलेल्या तीन परिषदील आरोपांची उत्तरे आहेत असा दावा शहा यांनी लोकसभेत केला. (Rahul Gandhi’s challenge made Shah’s hands tremble)

त्याचवेळी राहूल गांधी यांनी अमित शहा यांना रोखत यावर चर्चा करण्यासाठी आव्हान दिले. राहूल गांधी म्हणाले, कालच्या भाषणात निवडणूक आयुक्तांना पूर्ण सवलत का देण्यात आली आहे. आम्हाला त्यामागील कारणे समजून घ्यायची आहेत. तुम्ही हरियाणा उल्लेख केला. परंतु इतर अनेक उदाहरणे आहेत. ज्यात १९ लाख बनावट मतदारांचा समावेश आहे. चला माझ्या पत्रकार परिषदांवर चर्चा करुया. अमित शहाजी मी तुम्हाला तिन्ही पत्रकार परिषदेवर चर्चा करण्यासाठी आव्हान देतो. (Rahul Gandhi’s challenge made Shah’s hands tremble)

यावर अमित शहा यांनी उत्तर दिले की, राहूल गांधी तुम्ही माझ्या भाषणाचा क्रम ठरवू शकत नाही. तुम्ही धीर धरावा. तुम्ही हट्टीपणाने संसद चालवू शकत नाही. मी माझ्या भाषणाचा क्रम ठरवेन, सभागृह असे चालणार नाही. त्यांनी धीर धरावा. मी प्रत्येक मुद्द्याला उत्तर देईल. त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला. (Rahul Gandhi’s challenge made Shah’s hands tremble)

अमित शहा यांच्याबाबत आज गुरुवारी  राहूल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, अमित शाह काल संसदेत नर्व्हस होते. त्याचे हात कापत होते. त्यांनी चुकीच्या शब्दाचा वापर केला. अमित शाह मेंटली प्रेशरमध्ये होते हे काल साऱ्या देशाने पाहिले. मी मतचोरीविषयी विचारले तर त्यांनी उत्तरे दिली नाहीत. मी अमित शहांना मतचोरीच्या विषयावर पत्रकार परिषदेत  डिबेट करण्याचे आव्हान दिल्यावर त्यांनी उत्तर दिले नाही. सत्य काय आहे तुम्ही सर्वजण जाणता असेही ते म्हणाले.  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00