नवी दिल्ली : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बैठकीत पॉलिटिक्सपेक्षा पॉलिसी मेकिंगवर जास्त चर्चा झाली असा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला. पंतप्रधानासोबत वीस मिनिटे चर्चा झाली. आम्ही एनडीए जाणार नाही असे खासदार कोल्हे यांनी सांगितले. डिलिमिटेशन बिल अजून आलेच नाही त्यावर चर्चा कशाला ? असा सवाल त्यांनी केला. या बिलावर आम्ही यापूर्वीच आक्षेप घेतले आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (NCP MP meets the Prime Minister)
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधी पक्षांनी विद्यार्थी आदोलन प्रश्नांवर दोन्ही सभागृहाचे काम बंद पाडले आहे. त्यातच डिलिमिटेशन बिल मांडण्यासाठी तीन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची शक्यता वर्तवली आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष इंडिया आघाडीत असून आज पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधानाची भेट घेतल्याबद्दल एनडीए जाण्याची चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पवार गट एनडीए मध्ये जाणार असल्याचा वृत्ताचा अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना इन्कार केला.
आठ खासदारांच्या मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा
पंतप्रधानांच्या चर्चा बाबत त्यांनी माहिती दिली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानासोबत वीस मिनिटे चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि फुले पगडी देऊन पंतप्रधान यांचा सन्मान केला. आठ खासदारांच्या मतदार संघातील प्रश्नांवर चर्चा झाली. नाशिक पुणे रेल्वे आंदोलन, इंद्रायणी मेडिसिटी, चाकण एमआयडी बाबत चर्चा केली महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत पंतप्रधानाबरोबर चर्चा झाल्याचे खसदार कोल्हे यांनी सांगितले. (NCP MP meets the Prime Minister)
भेटीचा एनडीए मध्ये जाण्याचा अर्थ लावू नये
या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या भेटीचा संबध लगेचच एनडीए मधे जाण्याबाबत लाऊ नये असेही खासदार कोल्हे यांनी सांगितले. राजकारणापेक्षा पॉलिसी मेकिंगवर जास्त चर्चा झाली. यापूर्वी आम्ही मंत्र्यांना भेटलो होतो पण तोडगा निघत नव्हता म्हणून योग्य ठिकाणी आम्ही मुद्दा मांडला. आम्ही खासदारांनी आठही लोकसभा मतदारसंघातील मुद्दे मांडले. निलेश लंके यांनी आरोग्या बाबत अनेक मुद्दे पंतप्रधान यांच्या समोर मांडले पीएम गतिशक्तीचा मुद्दा महत्वाचा आहे, तो मार्गी लागेल हे अपेक्षित आहे.
डिलिमिटेशन बिलावर आमचे आक्षेप कायम
डिलिमिटेशन बिलाबाबत अमोल कोल्हे म्हणाले. हे विधेयक संसदेत सादर होऊ दे. त्याचा मसुदाच अजून समोर आलेला नाही मग त्यावर चर्चा कशाला? साप समजून भुई थोपटण्याचा काही अर्थ नाही. या बिलातील मसुद्यावर या आधीचे आमचे आक्षेप कायम आहेत. हेच विधेयक पुन्हा आले तर आमची भूमिका काय असेल हे आधीच दिसून आलेले आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. (NCP MP meets the Prime Minister)