जमीर काझी : मुंबई : वैद्यकीय प्रवेश अहर्ता परीक्षा (नीट) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातून टीकेचे धनी बनलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक बनले आहेत. या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर मैदानावर बेमुदत आंदोलन करीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पाठिंबा जाहीर करीत त्यांच्या समर्थनासाठी २० जुलैला सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र येण्याचचे असे आवाहन त्यांनी केले आहे.लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी त्यांची भेट घ्यावी , असेही त्यांनी सांगितले. (Uddhav Thackeray’s appeal to MPs from all parties)
ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर कडाडून हल्लाबोल केला. ते म्हणाले, गेली १६ दिवस त्यांचे प्राणांतिक उपोषण सुरू असून केंद्र सरकारचा एक मंत्री तिकडे जात नाही, यावरून भाजपला सत्तेचा किती माज आला आहे, हे स्पष्ट होते. काही दिवसांपूर्वी मी सोनम वांगचूक यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. प्राणांतिक उपोषण करू नका, या सरकारला त्याचं काही देणं-घेणं नाही, अशी विनंती मी त्यांना केली. त्यावर त्यांनी ‘मेरा कुछ भी होने दो, देश का भला होना चाहिए,’ असं उत्तर दिले. (Uddhav Thackeray’s appeal to MPs from all parties)
केंद्र सरकारला विरोधी पक्षाचे खासदार फोडण्यात रस
नीट पेपरफुटीप्रकरणामुळं देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. अनेकानी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, मात्र केंद्र सरकारने या गंभीर विषयाकडं दुर्लक्ष आहे. त्यांना तरुणांच्या भविष्याची चिंता नाही तर विरोधी पक्ष फोडण्यात अधिक रस आहे. देशाचं भविष्य धोक्यात आलं आहे, पण त्याकडं लक्ष देण्यासाठी सरकारकडं वेळ नाही. वांगचूक यांच्यासारख्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचा सन्मान केला पाहिजे. मात्र त्यांनाच देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगून ते म्हणाले, २० जुलैला दिल्लीत होणाऱ्या आंदोलन केवळ एका व्यक्तीचा लढा नाही, तर देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्व पक्षांचे खासदार या आंदोलनात सहभागी व्हावेत. भाजपाच्या खासदारांमध्येही जर माणुसकी शिल्लक असेल, तर त्यांनीही सहभागी व्हावं.” (Uddhav Thackeray’s appeal to MPs from all parties)
आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता
जंतरमंतरवरील आंदोलनाची सुरुवात करणाऱ्या अभिजीत दिपके देशातील तरुणांचा आवाज बुलंद करत आहेत. २० जुलैच्या आंदोलनापूर्वी काही समाजकंटकांकडून हिंसाचार घडवून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. केंद्र सरकारने याची गंभीर दखल घ्यावी. अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी तत्कालीन केंद्र सरकारने संवाद साधला होता. आजही एखाद्या मंत्र्याकडून काम होत नसेल, तर त्यांना बदलण्यात गैर काय आहे? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागी सक्षम व्यक्तीची नियुक्ती केली, तर त्यात चुकीचं काय?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Uddhav Thackeray’s appeal to MPs from all parties)