शेतकऱ्यांनी सावकारी पाशामुळे किडन्या विकल्या प्रकरणी आरोपींना मकोका लावा

Apply MCOCA to the accused in the kidney selling case. MCOCA

मुंबई :  विशेष प्रतिनिधी :  महाराष्ट्रात सावकारी पाशात अडकलेल्या शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या भीषण परिस्थितीवर विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी  सरकारला धारेवर धरले.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. लक्षवेधी प्रश्नाच्या माध्यमातून राज्यात सावकारांचे राज्य सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर जिल्ह्यातील रोशन कुडे या शेतकऱ्याकडून एका लाखाच्या कर्जासाठी ७४ लाख सावकाराने वसूल केले. शेवटी ट्रॅक्टर आणि शेती जाऊनही कर्ज फिटत नसल्याने शेतकऱ्यांवर किडनी विकण्याची वेळ आली. या पीडित शेतकऱ्याला परदेशात डेटा सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवून पाठवले गेले. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन या शेतकऱ्याला मायदेशी परत आणले. (Apply MCOCA to the accused in the kidney selling case. MCOCA)

या रॅकेटची पाळेमुळे दिल्ली आणि दक्षिण भारतापर्यंत पसरलेली आहेत. यात दिल्लीतील एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा समावेश असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. या डॉक्टराला अटक करण्याचे धाडस सरकार दाखवणार का? असा प्रश्न त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर  यांनीही सरकारला धारेवर धरीत खासगी सावकारांना मोक्का लावण्याची मागणी केली. (Apply MCOCA to the accused in the kidney selling case. MCOCA)

या किडनी रॅकेटमधील मुख्य सूत्रधार आणि सहभागी सावकारांवर ‘मोका’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री यांनी या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात येणार. अशा प्रकरणात कायदा कठोर करण्यासाठी सरकार काम करेल असे आश्वासन दिले. (Apply MCOCA to the accused in the kidney selling case. MCOCA)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर