Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्दीकी हत्येतील संशयित अनमोल बिश्नोईला अटक  

Anmol Bishnoi arrested

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येतील प्रमुख संशियत गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला एनआयच्या कोठडीत ११ दिवस ठेवण्याचा आदेश दिला. अभिनेता सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार त्याच्याच सूचनेवरुन झाल्याचा संशय आहे.  भारतातील तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोईचा तो भाऊ आहे. (Anmol Bishnoi arrested)

अनमोल बिश्नोई हा २०२२ पासून फरार आहे. दहशतवादी गोल्डी ब्रार आणि लॉरेनस बिष्णाई टोळीला अनेक दहशतवादी कारवायात तो मदत करत असल्याचे एनआयएला तपासात दिसून आले आहे. मार्च २०२३ मध्ये एनआयएने त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. (Anmol Bishnoi arrested)

अमेरिकेतून अनमोल हद्दपार केल्यानंतर भारताने अमेरिकेशी संपर्क साधून त्याला अटक केली. दिवंगत बाबा सिद्दीकीचे पुत्र झिशान सिद्दीकीने पाठवलेल्या स्वयंचलित डीएचएस-व्हीआयएनई सुचनेनंतर अनमोलची अमेरिकेतून हकालपट्टी केली आहे. १८ नोव्हेंबरला अनमोलची अमेरिकेतून हकालपट्टी करण्यात आली. गतवर्षी त्याला अमेरिकत बेकायदेशीर प्रवेश केल्यानंतर सॅक्रामेंटोमध्ये अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्याला हद्दपार केले. एफबीआयने डीएनए आणि आवाज तज्ज्ञाकंडून त्याची ओळख परेड केली. आसीई चौकशी सुरू असताना आयोवा येथील तुरुंगात ताब्यात घेतल्यानंतर तो अमेरिकेच्या रडारवर राहिला. फेसबुक अकाउंटवर त्याने सलमानखानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारनंतर आणि एका ऑडिओ क्लिपमध्ये त्याचे शूटर विकी गुप्ताबरोबरचे संभाषण टिपण्यात आले होते. (Anmol Bishnoi arrested)

Related posts

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या स्थानी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर