Amit Shah Poonch Visit : पाकिस्तानचे कंबरडे मोडले : अमित शहा

Amit Shah Poonch Visit

पूंछ : भारताने पाकिस्तानच्या नऊ हवाई तळांचे जबर नुकसान करून त्यांचे कंबरडे मोडल्यामुळे त्यांना युद्धविराम प्रस्तावासाठी पुढे येण्यास भाग पाडले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी (३० मे) केले. (Amit Shah Poonch Visit)

पूंछमधील गोळीबारग्रस्त निवासी भागांचा दौरा शहा यांनी केला. त्यानंतर ते बोलत होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारामुळे नुकसान झालेल्या सीमावर्ती रहिवाशांसाठी व्यापक मदत पॅकेज तयार करण्याचे आणि अधिक भूमिगत निवारा बांधण्याचे आश्वासनही शहा यांनी यावेळी दिले. (Amit Shah Poonch Visit)

ते म्हणाले, ‘‘७ मे च्या रात्री, पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि पाकिस्तानमधील दहशतवादी मुख्यालये आणि इतर केंद्रे उद्ध्वस्त करण्यात आली. अचूक गुप्तचर माहिती आणि सुरक्षा संस्थांनी केलेल्या नियोजनामुळे कोणत्याही नागरिकाचा मृत्यू किंवा पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य करण्यात आले नाही. आमच्या लष्कराने केलेल्या हल्ल्यात शेकडो दहशतवादी मारले गेले.’’

‘‘हादरलेल्या पाकिस्तानने हा हल्ला स्वतःवरचा हल्ला म्हणून घेतला. आम्ही जगासमोर हे सिद्ध झाले की पाकिस्तान दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रय देतो. दुसऱ्या दिवशी, जम्मू-काश्मीरच्या निवासी भागांना पाकिस्तानने गोळीबार करून लक्ष्य केले. यामध्ये पूंछला सर्वाधिक फटका बसला,” असे शहा म्हणाले. (Amit Shah Poonch Visit)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन संरक्षण धोरणांतर्गत भारताने दाखवून दिले आहे की अशा निंदनीय हल्ल्यांना त्याच तीव्रतेने उत्तर दिले जाईल. नागरिकांवर किंवा सीमेवर कोणत्याही प्रकारचे आक्रमण किंवा हल्ल्याला जोरदार आणि जबरदस्त उत्तर दिले जाईल हे स्पष्ट आहे. आपल्या सैन्याने ते दाखवून दिले, असेही ते म्हणाले.

तीन दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान सीमा सुरक्षा दलांनी (बीएसएफ) दाखवलेली सतर्कता आणि समर्पण मोठे आहे, असे गौरवोद्गार काढून शहा म्हणाले, ‘‘शांततेच्या काळातही बीएसएफ सतर्क राहिले आहे. बीएसएफने निवडकपणे कमीत कमी वेळेत ११८ पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्या किंवा त्यांचे नुकसान केले. त्या पुन्हा उभारण्यासाठी शत्रूला चार ते पाच वर्षे लागतील.’’ शहा यांनी पाकिस्तानशी चर्चेबाबत भारताची भूमिका पुन्हा स्पष्टपणे मांडली. ‘‘दहशतवाद आणि चर्चा, दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही,’’ असे ते म्हणाले.

हेही वाचा :
नीट-पीजी परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घ्या
भाजपच्या माजी नेत्याच्या मुलासह तिघांना सक्तमजुरीची शिक्षा

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर