अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी त्रयस्थ संस्थेकडून करावी : रोहित पवार

Ajit Pawar plane crash should be investigated by a third party

मुंबई : प्रतिनिधी : परदेशातील अनुभवी आणि तज्ज्ञ असलेल्या त्रयस्थ संस्थांकडून अजित पवारांच्या विमानाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. विमानाचा अपघात नसून घात असल्याची शंका जास्त असल्याने त्यांनी चौकशीची मागणी केली. अजितदादांच्या अपघातात आपल्याला राजकारण करायचे नसून मी, पवार कुटुंबिय आणि जनतेच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी चौकशीची गरज त्यांनी व्यक्त केली. (Ajit Pawar plane crash should be investigated by a third party)

आमदार रोहित पवार यांनी पूर्वघोषणेनुसार आज पत्रकार परिषद घेतली. अजितदादांच्या अपघाताबाबत प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे. हा अपघात होता की घात होता असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. ते म्हणाले, व्हीएसआर विमानाचे मालक व्ही.के.सिंग यांनी विमानामध्ये काहीही तांत्रिक अडचणी नव्हत्या. त्या चांगल्या स्थितीत होते. अपघाताच्यावेळी दृष्यमानतेची समस्या उद्धवली असे, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. पण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पाहता कंपनी मालकाचा दावा पूर्ण खोटा आहे. रोहित पवार यांनी पाच प्रश्न उपस्थित केले. विमानात काय बिघाड झाला होता. मेकॅनिकल फॅल्युअर झाले असेल का? उड्डाणाआधी विमानाची तपासणी करण्यात आली होती का? तपासणी करणारे कर्मचारी कोण? विमानाचा टेकलॉग कुठे आहे? विमानाचा एअरवर्दी रिपोर्ट कुठे आहे. विमानाचा रुटीन मेंटनन्स झाला नव्हता का? कोणी केला होता? विमानाचा हेव्ही मेंटनन्स कधी झाला होता? त्याचा अहवाल कुठे आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. (Ajit Pawar plane crash should be investigated by a third party)

 त्रयस्थ संस्थेकडून चौकशी करावी

अपघाताची चौकशी करण्यासाठी सीआयडीची नियुक्ती केली आहे. सीआयडी चांगली संस्था आहे. पण त्यांना विमानतळावर जाण्यास परवानगी नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. विमान अपघाताची चौकशी परदेशातील त्रयस्त संस्थेकडे द्यावी अशी मागणी केली. एनटीएसबी (National Transportaion Safty Board) ही अमेरिकेची संस्था आहे. पण विमान बनवणारी कंपनी अमेरिके जवळचीअसल्याने तपास पारदर्शक होऊ शकत नाही. फ्रान्समधील बीईए (Bureau of Enquiry and Analaysis fot Civil Aviation Safety) किंवा युकेतील एएआयबी (AAIB) यासारख्या संस्थाकडून चौकशी करण्यात येऊ शकते का याचा विचार राज्य सरकारने करावी, अशी सूचना केली. (Ajit Pawar plane crash should be investigated by a third party)

रोहित पवारांचा तिघांवर संशय

रोहित पवारांनी व्हीएसआर विमान कंपनी, अरो कंपनी, पायलट कपूर यांच्यावर शंका घेतली आहे. एरो नावाच्या कंपनीने व्हीएसआरचे विमान भाडेतत्वावर घेतले होते. शासन निर्णयानुसार हा व्यवहार झाला आहे. पवार नावाचा माणूस एरोचा हँडलर आहे. ही कंपनी बऱ्याच राज्यात काम करत आहे. या कंपनीचा राजकीय नेत्यांशी संबध आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

डीजीसीए वर विश्वास

नागरी विमान वाहतूक महासंचालनयावर (DGCA) आमचा विश्वास आहे. आम्ही सरकारवर कोणताही आरोप करत नाही. पण काही गोष्टी घडल्या असतील अशी आमची शंका आहे. विमानतळावर पोलिसांना परवानगी नसते. या प्रकरणाची तपासणी सीआयडी चौकशी करु शकत नाहीत. विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञ हवेत. ब्लॅक बॉक्समधील रेकॉर्डिंग, संपूर्णपणे परिवारातील एका व्यक्तीला तज्ज्ञ व्यक्तीसोबत बघण्याची संधी द्यावी. ही सरकारला विनंती असल्याचेही ते म्हणाले. २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर झालेल्या विमान अपघाताचा दाखला देताना दोन ते तीन वर्षे उलटूनही या अपघाताचा अहवाल बनवण्यात आला नसल्याचा खुलासाही रोहित पवार यांनी केला. रोहित पवारांनी कंपनीच्या सर्व विमानांचे आणि गेल्या दहा दिवसाच्या सीसीटीव्हीचे फुटेजचे सखोल ऑडिट व्हावे अशी मागणी केली. त्यामुळे खरे रहस्य समोर येईल असेही ते म्हणाले. (Ajit Pawar plane crash should be investigated by a third party)

दोन दिवसापूर्वी अपघातग्रस्त विमान सुरतला गेले होते

अजित पवारांच्या अपघाताच्या दोन दिवस आधीच अपघातग्रस्त विमान सुरतला जाऊन आले होते, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली. रोहित पवारांनी अपघाताची संपूर्ण टाईमलाईन मांडली. तसेच ग्रुप चॅटमध्ये जो संवाद झाला त्यांचे स्क्रीनशॉटही पवार यांनी दाखवले. त्यामध्ये विमानाची दृश्यमानता एकदम ठीक असल्याचे सांगितले.  (Ajit Pawar plane crash should be investigated by a third party)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर