विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू

Ajit Pawar dies in a plane crash

पुणे : प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बारामती विमानतळावर हा अपघात झाला. विमान बारामती विमानतळावर लँडिंग होताच मोठा स्फोट झाला. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. महाराष्ट्र शोकसागर बुडाला आहे. डीजीसीएने दिलेल्या अधिकृत माहितीनंतर अजित पवारांच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अंगरक्षक विदीप जाधव, पिंकी माळी, तसेच कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश आहे. (Ajit Pawar dies in a plane crash)

डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विमानात होते. त्यांच्यासोबत इतर दोन लोक म्हणजे एक पीएसओ आणि एक अटेंडंट तसेच दोन क्रू मेंबर्सही होते. सुरुवातीच्या माहितीनुसार, अपघातात विमानातील कोणीही वाचले नाही. दरम्यान, राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. बुधवारी अजित पवार यांचा बारामती दौरा होता. मुंबईहून बारामती दौऱ्यासाठी ते सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामतीसाठी प्रस्थान केले होते. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमान कोसळण्यापूर्वी विमानाचा मोठा आवाज येत होता. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला. घटनास्थळी विमानतळावरील कर्मचारी आणि अधिकारी धावले. आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळीच सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली. (Ajit Pawar dies in a plane crash)

दरम्यान, ही माहिती येताच खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार या दिल्लीवरून पुण्याकडे रवाना झाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी माध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी आम्ही पोरके झाल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, प्रफुल पटेल, अनिल देशमुख, खासदार निलेश लंके, आमदार धनंजय मुंडे यांनाही माहिती कळताच अश्रूंचा बांध फुटल्याचे दिसून आले. (Ajit Pawar dies in a plane crash)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर