Phule Cinema: ‘फुले’ चित्रपट टॅक्स फ्री करा

Phule Cinema

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘फुले’ हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी राष्ट्रवाछी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. मुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ. पाटील यांनी तसे पत्र लिहिले आहे. (Phule Cinema)

फुले दाम्पत्यावरील हा सिनेमा २५ एप्रिलला जगभरात प्रदर्शित झाला आहे. तो सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा या सिनेमाचे प्रदर्शन काही कारणांनी  लांबले. या सिनेमातील काही दृश्यांवर काही संघटनांनी आक्षेप घेतले होते. ते खोडून काढण्यात तसेच सेन्सॉर बोर्डाने केलेल्या सूचनांनुसार त्यातील दृश्ये आणि संवाद कमी करण्यात वेळ गेला. त्यामुळे हा सिनेमा महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजे ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होऊ शकला नाही. (Phule Cinema)

सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आहेत. आता हा सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आ. पाटील यांनी केली आहे. ते पत्र पाटील यांनी ‘एक्स’वर शेअर केले आहे. या पत्रात ते म्हणतात, ‘‘माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांचा संघर्षमय प्रवास प्रत्येकाने अनुभवायला हवा. या चित्रपटातून समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जिवंत इतिहास पहायला मिळतो. परिवर्तनवादी, पुरोगामी महाराष्ट्र घडवणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान झाला पाहिजे. आपल्या गौरवशाली इतिहासाचा ठसा प्रत्येकाच्या मनात उमटला पाहिजे.’’ (Phule Cinema)

‘‘दलितांना पाण्याचा हौद खुला केला. शिक्षणासाठी दारे उघडे केली. स्त्री शिक्षणासाठी पाऊल टाकले इतकाच मर्यादित महात्मा फुले आणि सावित्रीमाईचा इतिहास नाही. त्याहूनही व्यापक काम महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी करून ठेवले आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव इतका अफाट आहे. एकोणिसाव्या शतकात जसा त्यांच्या कार्याला विरोध केला गेला, तितकाच विरोध त्यांच्यावर २१ व्या शतकात करण्यात आलेल्या चित्रपटाला झाला. परिणामी चित्रपटातील जवळपास १२ सीन्स सेन्सॉर बोडोंने कापले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईचे विचार तोकडे पडले नाहीत. ‘फुले’ चित्रपट टॅक्स फ्री करत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे,’’ अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा :
देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात
‘डाकू दुल्हन’ने केली एवढी लग्ने

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर