Air Chief Marshal Sing: हवाई दल प्रमुखांनी घेतली ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहिदाच्या कुटुंबीयांची भेट

Air Chief Marshal Sing

झुंझुनू/पुणे : हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी श्रीमती सरिता सिंग यांच्यासमवेत राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील मेहरादासी गावाला भेट देऊन शहीद सार्जंट सुरेंद्र कुमार यांच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट घेतली. (Air Chief Marshal Sing)

सुरेंद्र कुमार यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान कर्तव्य बजावताना आपले बलिदान दिले. सिंग यांनी सुरेंद्र कुमार यांच्या आई श्रीमती नानू देवी, पत्नी श्रीमती सीमा आणि मुले वृतिका आणि दक्ष यांची भेट घेऊन विचारपूस केली.

भारतीय हवाई दलाने या भेटीचे फोटो त्यांच्या ‘एक्स’ अकाउंट (@IAF_MCC)वर प्रकाशित केले आहेत.

झुनझुनूला देशसेवेचा अभिमानास्पद वारसा आहे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात २१,७०० माजी सैनिक आहेत आणि भारतीय हवाई दलात ३,५५२ हवाई योद्धे सेवा देत आहेत, असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Air Chief Marshal Sing)
दरम्यान, एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राला भेट दिली. येथे त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जखमी झालेल्या कॉर्पल वरुण कुमार यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
तसेच या केंद्रातील इतर रुग्णांशीही संवाद साधला आणि केंद्राच्या उपक्रमांची माहिती घेतली. कमांडंट, डॉक्टर आणि कृत्रिम अवयव केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल आणि समर्पणाबद्दल कौतुक केले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर