One voter two EPIC: आमदार, खासदार दाम्पत्याकडे दोन दोन ओळखपत्रे

deenesh prasad veena devi

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने  गुरुवारी (१४ ऑगस्ट) वैशाली येथील लोक जनशक्ती पक्षाच्या (रामविलास) खासदार वीणा देवी आणि त्यांचे पती जनता दला (सं)चे विधान परिषदेचे आमदार दिनेश प्रसाद सिंह यांना नोटीस बजावली आहे. दोघांचेही नाव दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांच्या मतदार यादीत समाविष्ट आहे. या दाम्पत्याकडे प्रत्येकी दोन मतदार ओळखपत्रे आहेत, असा आरोप आहे. (One voter two EPIC)

मुझफ्फरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी (ERO) १ जुलै २०२५ रोजीच्या मतदार याद्यांच्या प्राथमिक पुनरावलोकनानंतर नोटीस बजावली आहे. दोघांनाही १६ ऑगस्ट २०२५ पर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे, अन्यथा पुढील कारवाई सुरू केली जाऊ शकते. (One voter two EPIC)

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी तसा जाहीर आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे. बुधवारी रात्री यादव यांनी एक प्रेस स्टेटमेंट जारी केले. त्यानंतर ‘एक्स’ वर तशी एक पोस्टही केली. त्यात त्यांनी पुन्हा सांगितले की वीणा देवी यांच्याकडे दोन मतदार फोटो ओळखपत्रे (EPIC) आहेत. UTO1134543 आणि GSB1037894 – या क्रमांकांनी मुझफ्फरपूर आणि साहेबगंज या दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये ते मतदार म्हणून नोंदणीकृत आहेत, याकडे यादव यांनी या पोस्टमध्ये लक्ष वेधले आहे.

त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गुरुवारी (१४ ऑगस्ट) यादव यांनी आणखी एक पोस्ट करत वीणा देवी यांचे पती दिनेश सिंग यांच्याकडेही मुझफ्फरपूर जिल्ह्यात दोन मतदार कार्ड आहेत आणि त्यांनीही दोन वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये अशीच नोंदणी केली आहे, असे म्हटले आहे. (One voter two EPIC)

यादव यांच्या या आरोपांना उत्तर देताना वीणा देवी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले, ‘‘माझे घर साहिबगंज मतदारसंघातील पारू ब्लॉकमध्ये आहे. मी २००१ पासून निवडणूक लढवत आहे. मी जेव्हा जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा माझे नाव या भागातील मतदार यादीत होते.’’

त्या म्हणाल्या की, कदाचित माझ्या लग्नाच्या वेळी माझे नाव मुझफ्फरपूरच्या मतदार यादीत समाविष्ट होते. त्यावेळी मी माझे नाव त्या यादीतून काढून टाकावे अशी विनंती करणारा अर्ज सादर केला होता. अजून माझे नाव त्या यादीत कसे आहे ते मला माहीत नाहीत. कदाचित एखाद्या अधिकाऱ्याने किंवा बूथ लेव्हल अधिकाऱ्याने केलेल्या चुकीमुळे नाव राहून गेले असेल.’’

दरम्यान, यादव यांनी केलेल्या दाव्यांची दखल घेत निवडणूक आयोगाने आता औपचारिक चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा :
वगळलेल्या ६५ लाख मतदारांची यादी जाहीर करा; सर्वोच्च न्यायालय
दोन मतदान ओळखपत्रे; महापौराला नोटीस

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर