…तर उपमुख्यमंत्रीपद ताबडतोब रद्द करा : उद्धव ठाकरे

Abolish the post of Deputy Chief Minister

नागपूर : प्रतिनिधी : विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. लवकरात लवकर नियुक्ती केली जाईल असे आश्वासन नार्वेकर आणि शिंदे दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जर विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केली नाही तर उपमुख्यमंत्रीपद ताबडतोब रद्द करा, अशी मागणी केली.

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच हिवाळी अधिवेशन विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाशिवाय सुरू आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय दोन्ही सभागृहाचे प्रमुख घेतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीने विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती शिंदे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती करावी अशी मागणी केली. आज उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर आणि शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकाराशी बोलताना म्हणाले, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सभागृहात विरोधी पक्षनेता असायला हवा. ते पद आहे. मात्र त्यावर पदावर नियुक्ती झालेली नाही. लवकरात लवकर विरोधी पक्षनेता नियुक्त करावा अशी मागणी केली आहे.  राज्य सरकार आणि दोन्ही सभागृहाच्या प्रमुखांना सांगणं आहे की नियमांची आडकाठी कराल तर मग मी उपमुख्यमंत्रीपदाचा विषय काढेन. (Abolish the post of Deputy Chief Minister)

उद्धव ठाकरे म्हणाले, मी उपमुख्यमंत्र्पदाचा विषय त्यांच्या कानावर घातला आहे. कारण हे पदही संवैधानिक नाही. जर तुम्ही विरोधी पक्षनेतेपदापुढे नियमाची आडकाठी आणाल तर मग आम्ही उपमुख्यमंत्रीपदाचा विरोध करु. काही आपल्या नावापुढे उपमुख्यमंत्रीपद हे बिरुद मिरवत आहेत. नको त्या लोकांच्या नावापुढे हे बिरुद लावले आहे. ते पदही ताबडतोब रद्द करा, अशी मागणी ठाकरे यांनी केली.  (Abolish the post of Deputy Chief Minister)

अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहानां विरोधी पक्षनेता मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. आमच्या सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्रीपद होते. त्याचबरोबर विरोधी पक्षनेता देखील होता. आम्ही दोन्ही पदांचे स्वागत केले होते. नियम हे सगळीकडे सारखेच असायला हवेत. विरोधी पक्षनेत्याला नियमांची मोजपट्टी लावत असाल तर उपमुख्यमंत्रीपदालाही नियमांची मोजपट्टी वापरा. (Abolish the post of Deputy Chief Minister)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर