अजितदादांबद्दल नेत्याकडून खालच्या स्तरावर कॉमेंट; सुनेत्रा पवारांनी ऑडिओ ऐकला! 

A leader makes a derogatory remark regarding Ajitdada

जमीर काझी : मुंबई : अजित दादा यांच्या पक्षातील एका नेत्याने दादा हयात असताना त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या स्तराबद्दल बोलले होते, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आ. रोहित पवार यांनी शनिवारी केला.  तो ऑडिओ सुनेत्रा काकीनी ऐकला आहे,अशी माहिती मला सूत्रांनी दिली असल्याचेही सांगितले.

राष्ट्रवादी पक्षामध्ये पार्थ व जय पवार विरुद्ध सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल असा अंतर्गत संघर्ष सुरू असल्याची उघडपणे चर्चा सुरू आहे. तसेच तटकरे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला ऊत आला आहे.त्याबाबत पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले की, ‘ तटकरे यांच्यासोबत आणखी एक वरिष्ठ नेता होता, अशी माझी माहिती आहे. तटकरे, पटेल यांचे साहेबाशी जुने संबंध आहेत. त्या भेटीबद्दल स्वतः पवार साहेबांनी सांगितले असल्याने वेगळ्या चर्चा करण्यात अर्थ नाही. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आणण्याचा विषय अजित पवार असताना होता. त्यावेळी भाजपाविरुद्ध भूमिका घ्यायचे आमचे ठरले होते, दादा नंतर आमच्याकडून तो विषय बाजूला ठेवण्यात आला आहे.” ऑडिओबद्दल भाविष्यात  कधीतरी तो विषय स्पष्ट होईल, जे साहेबांच्या,दादाच्या जीवावर मोठे झाले ते त्यांना विसरले आहेत. असे नेते जनतेचे कसे होणार?, असा टोला त्यांनी पटेल, तटकरे यांना लगावला. (A leader makes a derogatory remark regarding Ajitdada)

ज्यात रोज २४ बलात्काराच्या घटना

 रापुण्यातील चार वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असताना रोहित पवार यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात दररोज जवळपास २४ बलात्काराच्या घटना घडत आहेत, म्हणजेच प्रत्येक तासाला एक बलात्कार होत असल्याचा दावा त्यांनी केला.

३० हजार तरुणी अजुनही बेपत्ता

ते म्हणाले,’ २०२५ मध्ये पोक्सो कायद्यांतर्गत १३ हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय विनयभंग आणि महिलांवरील अत्याचाराची ५० हजारांपेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत. राज्यात तब्बल दीड लाख महिला आणि तरुणी बेपत्ता असून त्यापैकी सुमारे ३०हजार जणींबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असा दावा त्यांनी केला. (A leader makes a derogatory remark regarding Ajitdada)

राज्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचं सांगत त्यांनी सरकारवर पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप केला. “गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलीस दलाचा वापर राजकीय विरोधकांवर दबाव आणण्यासाठी आणि व्हीआयपी सुरक्षेसाठी केला जात आहे,” असं ते म्हणाले. बदलापूर, चाकण, बीड, गोंदिया, बारामती आणि मावळ येथील घटनांचा उल्लेख करत त्यांनी अनेक गंभीर प्रकरणांमध्ये ९० दिवस उलटल्यानंतरही आरोपपत्र दाखल झाले नसल्याचा आरोप केला. पीडितांना न्याय मिळवून देण्यात दिरंगाई होत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

पीडित कुटूंबियाची डीजीशी भेट 

जळगाव आणि अन्य ठिकाणच्या गुन्ह्यातील  पीडिताचे कुटुंबियानी  व्यथाही पत्रकार समोर व्यक्त केल्या त्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्या समवेत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंदाचे यांची भेट घेऊन त्यांच्यावर खटल्यात पोलिसांकडून होत  असलेल्या विलंबाबाबत  कार्यवाही करण्याची मागणी केली. (A leader makes a derogatory remark regarding Ajitdada)

Related posts

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. आर.के. कामत यांची निवड

भाई माधवराव बागल पुरस्कार डॉ. विजय चोरमारे यांना जाहीर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते विलास लवांडेंना अटक, संग्राम भंडारे मोकाट