काँग्रेस करणार ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह

Raghupati Raghava Rajaram’ Satyagraha

जमीर काझी : मुंबई : अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराला रामभक्तांनी  दिलेल्या  करोडो रुपये, सोने चांदीचे दागिने दान दिले.  पण  भाजपा व रा. स्व. संघाच्या लबाड बगलबच्चांनी त्यावर दरोडा टाकला आहे. त्यांना कठोर शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एल्गार पुकारला असून  मंगळवारपासून (दि. ७ ) राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. (Raghupati Raghava Rajaram’ Satyagraha)

 देणग्यांवर टाकलेला दरोडा नसून श्रीरामाच्या नावावर कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवरच टाकलेला दरोडा आहे. रामाला लुटणाऱ्या भाजपा व रा. स्व. संघाच्या दरोडेखोराना त्याचे शासन व्हावयास हवे, यासाठी हे आंदोलन पुकारले आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी सकाळी अकरा वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात  आंदोलनाचा शंखनाद केला जाईल. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. . (Raghupati Raghava Rajaram’ Satyagraha)

त्यानंतर ९  ते १४ जुलै दरम्यान राज्यभर सर्व जिल्ह्यात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी राम मंदिर, शिव मंदिर अथवा हनुमान मंदिरात हा सत्याग्रह केला जाणार आहे. “मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या नावावर पैसे खाणाऱ्या भाजपा, आरएसएसच्या लबाड लोकांना सुबुद्धी दे”, अशी प्रार्थनाही यावेळी देवाकडे केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे. . (Raghupati Raghava Rajaram’ Satyagraha)

Related posts

पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे

शासकीय यंत्रणा २४ बाय ७ अलर्ट मोडवर

मुंबईतील १२ लोकांचा मृत्यू  फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे:  सपकाळ