90 crore prize money : भारतीय महिला क्रिकेट संघावर ९० कोटींचा वर्षाव

90 crore prize money

नवी दिल्ली : विश्वचषक पटकावणाऱ्या भारतीय महिला संघांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना संघावर करोडो रुपये बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. भारत महिला संघाला ९० कोटी रुपयेहून अधिक रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहेत. आयसीसीकडून ४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या बक्षिस मिळणार असून त्याचा फायदा भारतीय खेळाडूंना मिळणार आहे. बीसीसीआयने तर भारतीय महिला संघावर बक्षिसाची खैरात करताना ५१ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर कले आहे.

बीसीसीआयकडून बक्षिस जाहीर

नवी मुंबईच्या डी. वाय.  पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवल्यानंतर देशभर शुभेच्छाचा वर्षावर होता. तसेच खेळाडूंवर बक्षिसांचा पाऊस पडला आहे. विजयी संघाला मिळालेली बक्षिसाची रक्कम आणि बीसीसीआयने जाहीर केलेले ५१ कोटी असे ९० कोटी रुपये संघाला मिळणार आहेत. (90 crore prize money)

ट्रॉफीसह भारतियांची मने जिंकली

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी त्यांच्या पहिल्या विश्वविजेत्याच्या सन्मानार्थ खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसह संपूर्ण पथकासाठी ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. “१९८३ मध्ये कपिल देव यांनी विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये एक नवीन युग सुरू केले. तोच उत्साह आणि प्रोत्साहन आता महिलांनीही दिले आहे. हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर त्यांनी सर्व भारतीयांची मने जिंकली आहेत,” असे सैकिया यांनी एएनआयला सांगितले. (90 crore prize money)

आयसीसीकडून ३९,७८ कोटी रुपये बक्षिस

भारताच्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून विक्रमी ४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (३९.७८ कोटी रुपये) बक्षीस रक्कम मिळाली – जी कोणत्याही क्रिकेट विश्वचषकासाठी आतापर्यंतची सर्वाधिक आहे.  आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या नेतृत्वाखाली आयसीसीला ही चालना मिळाली, ज्यांनी यापूर्वी लिंग समानता आणि महिलांच्या खेळात गुंतवणूकीसाठी केलेल्या व्यापक प्रयत्नांचा भाग म्हणून महिलांच्या बक्षीस रकमेत तिप्पट वाढ केली होती. “जय शाह यांनी बीसीसीआयचा कार्यभार स्वीकारल्यापासून, अनेक परिवर्तने घडली आहेत – वेतन समानता, प्रशिक्षकांमध्ये सुधारणा आणि डब्ल्यूपीएलचा उदय यामुळे महिला क्रिकेट कायमचे बदलले आहे,” असे सैकिया पुढे म्हणाल्या. (90 crore prize money)

हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना , शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या विश्वचषकातील खेळाडूंची इतिहासात केवळ चॅम्पियन म्हणूनच नव्हे तर महिला क्रिकेटला प्रतिष्ठा आणि समृद्धीच्या व्यवसायात रूपांतरित करणाऱ्या अग्रणी खेळाडू म्हणून नोंद होणार आहे. (90 crore prize money)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर