८० हून अधिक बकऱ्यांचा कालव्यात बुडून मृत्यू

80 goats drowned in a canal

बेळगाव : प्रतिनिधी :  यात्रेतील  फटाक्याच्या आवाजाला घाबरून कालव्यात पडून ऐशीहून अधिक  बकरी मृत्यूमुखी पडल्या.  बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीतालुक्यातील यादवाड येथे ही दुर्दैवी घटना घडली. (80 goats drowned in a canal)

फटाक्याच्या आवाजाला घाबरून कालव्यात ऐशी हून अधिक बकरी कालव्यात पडून मृत्यूमुखी पडल्याने धनगरांचे वीस लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. यादवाड येथे श्रावण मासानिमित्त लक्ष्मी देवीची धनगरांची बकऱ्याची  यात्रा भरली होती. बकऱ्याची यात्रा सुरु असताना अतिउत्साही भक्ताने फटाके फोडले. फटाक्याचा आवाज ऐकून बकरी घाबरून सैरभैर होऊन पळू लागली आणि तेथे लगतच असलेल्या कालव्यात बकरी पडली. कालव्यात पडून ऐशी हून अधिक बकरी मृत्यूमुखी पडल्याने धनगर कुटुंबियांनी आक्रोश केला. घटनास्थळी कुलगोड पोलीस दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. (80 goats drowned in a canal)

Related posts

शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची व्याप्ती मराठवाडा, विदर्भात वाढवणार

मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ