मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

Marathi actress Madhu Kambikar passes away

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रसिद्ध नृत्यांगणा, लावणी कलावंत, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर (७३) यांचे पुणे येथे निधन झाले. अरविंद देशपांडे आणि राजदत्त  दिग्दर्शित ‘शापित’ या  मराठी चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. गेले बरेच दिवस त्या पक्षाघाताने अंथरुणात खिळून होत्या. आज सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी चित्रपटसृष्टीतील एका चांगल्या कलाकाराला मुकल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Marathi actress Madhu Kambikar passes away)

वगनाट्यातून अभिनयास सुरुवात

मधु कांबीकर यांच्या अभिनयाच्या सुरुवात वगनाट्यातून सुरू झाली. दादू इंदुरीकरांच्या ‘गाढवाचं लग्न’ या नाटकात मधु कांबीकर यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. ‘भानगडीशाय पुढारी नाही’. ‘विच्छा माझी पुरी करा’ या गाजलेल्या नाटकातून त्यांच्या अभिनयाची वाखाखणी झाली.  

शापित चित्रपटातील भूमिका गाजली

मधु कांबीकर यांनी ५० हून अधिक चित्रपटात काम केले. १९८२ मध्ये ‘शापित’ चित्रटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. जब्बार पटेल यांचा ‘एक होता विदूषक’, ‘आई तुळजा भवानी’, ‘आज झाले मी मुक्त’, ‘खट्याळ सासू,नाठाळ सून’, ‘चल रे लक्ष्या मुंबईला’, ‘घे भरारी’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’, ‘दोघी’, ‘निर्मला मच्छिंद कांबळे’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘मुक्ता’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘सुत्रधार’, ‘सातवा आसमा’, ‘यशवंत’ या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले होते. ‘मधुरंग’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून नटवर्य केशवराव दाते पुरस्काराने गौरवण्यात आले. (Marathi actress Madhu Kambikar passes away)

दहा वर्षे अंथरुणाला खिळून

मधु कांबीकर लोक कलाकार होत्या. लावणी या लोककलेसाठी त्यांनी वाहून घेतले होते. लावण्य संगीत या कार्यक्रमांची त्यांनी निर्मिती केली होती. तब्बल बारा वर्षानंतर २७ नोव्हेंबर २०१६ रोजी मधु कांबीकर यांच्या आयुष्यात दुदर्वी घटना घडली. कार्यक्रमात नृत्य करत असताना त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागले. पण त्यांनी नृत्य करणे थांबवले नाही. त्यांनी जिद्दीने सादरीकरण पूर्ण केले. त्यानंतर त्या मेकरुपमध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्याचा उजवा हात बधीर झाला. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्या आजारी पडल्या आणि अभिनयापासून दूर रहावे लागले. २०१८ मध्ये झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्या. पण पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांची सून शीतल जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला. (Marathi actress Madhu Kambikar passes away)

Related posts

शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलनाची व्याप्ती मराठवाडा, विदर्भात वाढवणार

अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ

मोदी-शाहांची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढा : राज ठाकरें