मुंबई : प्रतिनिधी : महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळातील गिरीश महाजन हे भ्रष्ट मंत्री आहेत, अशी आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. महाजनांच्या कार्यालयात ३०० फाईल्स् पडून असून व्यवहार झाल्यानंतर फाईल क्लिअर होते, असा आरोपही त्यांनी केला. (300 files pending )
मुंबई घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार राऊत यांनी मंत्री महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. मोठी मिन्नतवारी करुन त्यांना मंत्रालय देण्यात आले. महाजनांवर भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणे असल्याने केंद्रीय समितीचा महाजन यांच्या मंत्रीपदाला विरोध होता. महाजन यांच्या मंत्रालयात अभिषेक कौल नावाची व्यक्ती बिल्डर आणि ठेकेदार असून त्याचा फोन आल्यावरच महाजन आपत्ती व्यवस्थापनाची एक फाईल मंजूर करतात. कौल यांच्याकडे सर्व पैसे जमात होतात, असा आरोपही राऊत यांनी केला. (300 files pending )
महाजन यांच्या मंत्रालयात तीनशे फाईल्स पडून असून त्याचे व्यवहार पूर्ण झलेले नाहीत. महाजन यांनी नेमलेला ठेकदार फाईल क्लिअरिंगचे व्यवहार पाहतो. फडणविसांनी याच् पुरावे मागावेत. मी त्यांना देण्यास तयार आहे. पण फडणवीस त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत, हे मला माहित आहे. पण संपूर्ण राज्याला कळले की फडणवीसांच्या मंत्रीमंडळात महाजनांसारखे मंत्री आहेत. (300 files pending )
धारावीच्या नावाखाली १७ हेक्टर जमिनीचा घोटाळा
कुर्ला येथील मदर डेअरीची जागा अदानी समुहाला देण्यात आली आहे. हा मुंबईतील सर्वात मोठा भुखंडाचा घोटाळा आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईतील प्रत्येक मोकळा भुखंड हा धारावीच्या नावाखाली गौतम अदानींना देणे हे सुद्धा फडणवीस करत असलेला भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदींची साथ आहे. अदानींना वडाळ्याची मिठागरं, डंम्पिंग ग्राउंड, मदर डेअरी, महानंद डेअरीचा जागा हवी आहे याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.