१० वर्षात १५२ पेपर फुटले, साडेसात कोटी विद्यार्थी भरडले : राहूल गांधी

152 exam papers leaked in 10 years

नवी दिल्ली : नीट परिक्षेत घोळ, दिल्लीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने मोर्चा खोलला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावर आंदोलन करणाऱ्या राहूल गांधींना पोलिसांनी फरफटत नेले. रात्री उशिरा सुटका झाल्यानंतर राहूल गांधी यांनी आज बुधवारी पत्रकार परिषद घेत भाजपच्या शिक्षण व्यवस्थेवर हल्ला चढवला. गेल्या १० वर्षात पेपरफुटीच्या १५२ घटना घडल्या असून साडेसात कोटी विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. देशाचे शिक्षणावरील बजेट १.४ लाख कोटी इतके असताना नीट परीक्षेवर १.३२ लाख कोटी खर्च झाले आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.    त्यावेळी त्यांनी सोमवारी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेले व्हिडिओही दाखवले. (152 exam papers leaked in 10 years)

देशाचे शिक्षण बजेट १.४ लाख कोटी, नीट परीक्षेवर खर्च १.३२ कोटी

पत्रकार परिषदेत राहूल गांधी म्हणाले, गेल्या दहा वर्षात देशात पेपर फुटण्याच्या १५२ घटना घडल्या आहेत. पेपरफुटीमुळे आपले विद्यार्थी अस्वस्थ आणि प्रचंड तणावाखाली आहेत. त्याचा फटका देशातील साडेसात कोटी विद्यार्थ्यांना बसला आहे. हे विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत. तरीही आतापर्यंत कोणाचाही जबाबदारी निश्चित केलेली नाही. या परिक्षांचा खर्च अवाढव्य वाढला आहे. दरवर्षी नीट परीक्षेवर १.३२ लाख कोटी रुपये खर्च केले जातात. तर भारत सरकारचे एकूण शिक्षण बजेट १.४ लाख कोटी रुपये इतके आहे. सरकार संपूर्ण बजेटवर जेवढा खर्च करते तेवढाच खर्च नीट परिक्षेसाठी केला जातो याकडे त्यांनी लक्ष्य वेधले. (152 exam papers leaked in 10 years)

राहूल गांधी यांनी पत्रकार परिषदेत तीन मागण्या केल्या. त्यामध्ये शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी  अशा मागण्या केंद्र सरकारकडे केल्या आहेत.

Related posts

शेट्टी, जानकरांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

विद्यार्थी आंदोलनाचे लोण मुंबईसह राज्यभरात

पहिल्या यादीत फक्त ५५३ शेतकऱ्यांना कर्जमाफी