विद्यार्थी आंदोलनाचे लोण मुंबईसह राज्यभरात

Student protests spread across the state

जमीर काझी : मुंबई:  नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद  आता देशभरात पसरले असताना  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात  तीव्रपणे उमटत आहेत. केंद्र सरकारची अघोषित हुकूमशाहीचा निषेध आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी  मुंबईतील दादर, शिवाजी पार्क, चेंबूर आणि जुहू परिसरात संतप्त विद्यार्थी, युवा आणि विविध संघटनांनी रस्त्यावर उतरले . तर पुणे,नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर येथेही केंद्र सरकार व केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने केली. चेंबूर येथे जमलेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.  आंदोलकांना जबरदस्तीने गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात नेऊन सोडले. (Student protests spread across the state)

पावसात विद्यार्थ्यांचे आंदोलन

पावसाची रिपरिप सुरू असतानाही आंदोलनाच्या ठिकाणी ‘ विई वॉन्ट जस्टीस’, ‘तानाशाही नही चलेगी’, ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो’, ‘मोदी मुर्दाबाद’, अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला होता. केली. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या  आंदोलन  केल्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून गाडी कोंबले होते त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आज राज्यात सर्व प्रमुख शहरांमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा व शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निषेद्याच्या घोषणाने परिसर दणाणून सोडला. (Student protests spread across the state)

९०० आंदोलकांवर गुन्हे दाखल

विद्यार्थ्यांच्यावर केलेल्या अमानुष  हल्ल्याच्या निषेधार्थ आज मुंबईत दादर (चैत्यभूमी), शिवाजी पार्क, चेंबूर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान) आणि जुहू परिसरात शेकडो विद्यार्थी एकवटले. त्यांच्याकडून शांतते त ते निदर्शने केली जात असताना मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व जमावबंदीच्या आदेशाचे (कलम १४४) उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी कडक पावले उचलली. शिवाजी पार्क आणि चेंबूर परिसरातून ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल करून शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा

मनसे नेते अमित ठाकरे, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला.या आंदोलनांविषयी सर्वसामान्य नागरिकांत तीव्र सहानुभूती व्यक्त होत असून सरकारचा निषेध करण्यासाठी लोक उस्फूर्तपणे रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे देशाबरोबरच राज्यातील वातावरण संवेदनशील बनले असून सरकारची डोकेदुखी वाढली आहे. (Student protests spread across the state)

Related posts

शेट्टी, जानकरांचा विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

पहिल्या यादीत फक्त ५५३ शेतकऱ्यांना कर्जमाफी

१० वर्षात १५२ पेपर फुटले, साडेसात कोटी विद्यार्थी भरडले : राहूल गांधी