मुडद्यांना जिवंत केल्याबद्दल सरन्यायाधीशांचे आभार; खासदार राऊतांचा टोला

Raut takes a dig at the Chief Justice

नवी दिल्ली : संसदेच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळाली. कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आवाहनानंतर युवा पिढीने थेट संसद भवनावर मोर्चाने धडक मारल्याने आंदोलकांवर पोलिसांना लाठीमार केला. अश्रुधुराची नळकांडी फोडली. तरीही आंदोलकांनी हार न मानता आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनाचे श्रेय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना देत टोला मारला.  (Raut takes a dig at the Chief Justice)

वांगचुक यांच्या आवाहनाला पाठिंबा

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्य कांत यांनी काही दिवसापूर्वी आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते, माहिती कार्यकर्त्यांना झुरळ संबोधले होते. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मिडियावर कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. त्याला सोशल मिडियावर उदंड प्रतिसाद मिळाला. नीट पेपरफुटीवर कॉक्रोज पार्टीने सोशल मिडियावर रान उठवले. अमेरिकेतून भारतात परतलेल्या अभिजीत दीपके यांनी भारतात मोठ्या शहरात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने केली. कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर लडाखमधील पर्यावरण चळवळीतील नेते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले. वीस दिवसात त्यांचे वजन आठ किलोंनी कमी झाले. त्यांच्या प्रकृतीला होणारा धोका पाहता दिल्ली उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केल्यानंतर शनिवारी दिल्ली पोलिसांना उपोषणास्थळावरुन वांगचुक यांना उचलून नेले. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. वांगचुक यांनी २० जुलै रोजी देशातील जनतेला संसदेवर मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. देशातील अनेक राजकीय पक्षांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. (Raut takes a dig at the Chief Justice)

महान आंदोलनाचे श्रेय एकाच व्यक्तीला

आज सोमवारी संसद भवनावरील मोर्चासाठी देशभरातील हजारो विद्यार्थी दिल्लीत आले होते. आंदोलक संसद भवनाच्या दारापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन सरन्यायाधीशांना टोला लगावला आहे. ‘एक्स’वर राऊत यांनी असे म्हटले आहे की, “सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश माय लॉर्ड सूर्यकांत जी, आज के महान आंदोलन का श्रेय सिर्फ एक व्यक्ती को जाता है! देश के मुर्दो को जिंदा करने के लिया आभार, शुक्रिया!” असा टोला मारला आहे. (Raut takes a dig at the Chief Justice)

Related posts

`केडीसीसी` ला रिझर्व बँकेकडून १३ लाखांचा दंड

… आणि झुरळांनी मोदींची खुर्ची हलवली!

राजधानी दिल्लीत `संसद से सडक तक` `जेन झी`चा एल्गार