आदमापूर बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये ६१ कोटींचा घोटाळा

Scam of Rs 61 crore in Balumama Trust

कोल्हापूर : प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत सद्गुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्टमध्ये तब्बल ६१ कोटी ७४ लाखाचा घोटाळा झाला आहे. मार्च २०२० ते २०२६ या कालावधीत घोटाळा झाल्याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात ट्रस्टच्या तत्कालिन कार्याध्यक्ष रागिनी खडके आणि सचिव रावसाहेब कोणेकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कोट्यवधीच्या अपहारामुळे बाळूमामांच्या भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे.  या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन भुदरगड पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी माहिती दिली. (Scam of Rs 61 crore in Balumama Trust)

घोटाळ्याचे स्वरुप

मुंबई धर्मादाय आयुक्त येथील देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकरी यांनी भुदरगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०२० ते २०२६ या कालावधीत ट्रस्टमध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता, देवस्थाच्या जमिन खरेदी विक्रीत झालेला ३० कोटींचा गैरव्यवहार, बाळूमामांच्या ४४ हजार मेंढ्याच्या विक्रीत दाखवलेला कमी दर याचा उल्लेख आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उप अधीक्षक सुवर्णा पत्की यांनी देवस्थान समितीकडील कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून त्यांची छाननी सुरू आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले. (Scam of Rs 61 crore in Balumama Trust)

खडकेंचा खुलासा

माजी कार्याध्यक्ष रागिनी खडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. मे २०२४ ते जुलै २०२५ मध्ये हा व्यवहार झाला असून या कालावधीत मी ट्रस्टची भाग नव्हते असा खुलासा खडके यांनी केला आहे. २१ ट्रस्टी असताना दोघांवरच गुन्हा का दाखल केला आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.  (Scam of Rs 61 crore in Balumama Trust)

Related posts

‘लेम डक प्रेसिडेंट’सारखी मोदींची अवस्था ; राज ठाकरे यांचा हल्लाबोल 

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

पोलिसांनी राहूल गांधी, प्रियांका, अखिलेश यांना घेतले ताब्यात