दुष्काळ दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का?;  उद्धव ठाकरेंचा सवाल 

Uddhav Thackeray questions the government on drought relief measures

जमीर काझी : मुंबई : “राज्यात शेतकरी गंभीर संकटात असताना सरकारकडून केवळ घोषणा आणि दौरे सुरू आहेत. आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, कर्जमुक्ती करू, दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करू, अशा घोषणा केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, हा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांचे दुष्काळाचे हे दौरे काजू-बदाम खाण्यासाठी आहेत का?” असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर तातडीनं चर्चा करण्यासाठी आठवड्याभरात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी त्यांनी केली. (Uddhav Thackeray questions the government on drought relief measures)

दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवा

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्यात मोठं नुकसान झाले. सरकारने ३१ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले. त्यातील प्रत्यक्ष किती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली, याचा हिशोब सरकारने द्यावा, “यंदा पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी पिकं करपली असून दुबार-तिबार पेरणीचं संकट निर्माण झालं आहे. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. अशा परिस्थितीत पंचनाम्यांसाठी ५ ऑक्टोबरपर्यंत वाट का पाहिली जात आहे,” दुष्काळाच्या प्रश्नावर किमान दोन ते तीन दिवसांचं विशेष अधिवेशन तातडीनं बोलावावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच या अधिवेशनात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावेत, असं ते म्हणाले. (Uddhav Thackeray questions the government on drought relief measures)

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात ठाण मांडून दुष्काळ निवारण्याची जबाबदारी घ्यावी

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तीन महसूल विभागांत तातडीनं मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्याची मागणी त्यांनी केली. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यांमध्ये ठाण मांडून दुष्काळ निवारणाची जबाबदारी घ्यावी, असंही ठाकरे यांनी सांगितलं. दुष्काळ कोणत्या पक्षाचा नसतो. ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भरपाईबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी

 शेतकऱ्याला तातडीने मदत हवी आणखी दोन-तीन दिवसांच्या घोषणांची गरज नाही,’ असे सांगून ते म्हणाले सरकारनं दुष्काळ जाहीर करण्याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ झाला. किती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली. याची जिल्हानिहाय आणि गावनिहाय माहिती जाहीर करावी. पीकविमा योजनेत शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्याचा दावा करताना नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगत सरकारवर टीका केली. पीकविमा, नुकसानभरपाई आणि कर्जमाफीबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका जाहीर करावी,” असेही त्यांनी सांगितले. (Uddhav Thackeray questions the government on drought relief measures)

Related posts

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतरवर जाणार :  अभिजीत दिपकें

उपमुख्यमंत्रीचे पुत्र म्हणून पार्थ पवाराना वेगळा न्याय मिळतोय का?

प्रॅक्टिस फुटबॉल क्लबच्या २०० खेळाडूंचा होणार गौरव