‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणी पंतप्रधान मोदी विरोधात युवक काँगसचे आंदोलन

Youth Congress protest

जमीर काझी : मुंबई : ‘एपस्टाईन फाईल्स’ मधील खुलासे आणि पंतप्रधानांचे नाव या प्रकरणाशी जोडले जाणे हे भारतासाठी अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. या प्रकरणामुळे भारत सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईत तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या व भाजपच्या निषेधाने परिसर दणाणून सोडला. (Youth Congress protest)

युवक अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या की, , एपस्टीन प्रकरणाचा वापर भारताच्या धोरणांवर दबाव आणण्यासाठी करण्यात आला होता का? पंतप्रधान  मोदी हे आपल्या वैयक्तिक प्रतिमा आणि राजकीय अस्तित्वासाठी देशाच्या दीर्घकालीन धोरणात्मक हितांशी तडजोड करत आहेत का, हा प्रश्न आज देशासमोर उभा आहे. हा केवळ आरोप नसून, जर निर्णय स्वतंत्र, संस्थात्मक आणि राष्ट्रीय हिताचे असतील तर सरकारने तात्काळ स्पष्ट करावे की परराष्ट्र धोरण, ऊर्जा आणि सुरक्षेशी संबंधित निर्णय कोणत्या आधारावर, कोणत्या प्रक्रियेद्वारे आणि कोणाच्या फायद्यासाठी घेण्यात आले. (Youth Congress protest)

‘एपस्टाईन फाईल्स’ मधून उघड झालेल्या तथ्यांमुळे भारत सरकारची कार्यपद्धती, परराष्ट्र धोरण आणि निर्णयप्रक्रिया यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांना एका कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची मदत मिळाल्याचे उल्लेख, तसेच अमेरिकन सत्तास्थानांपर्यंत पोहोचण्यासाठी खाजगी उद्योगपतींची भूमिका, हे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि संस्थात्मक राजनैतिक व्यवस्थेवर थेट आघात करणारे आहेत.असे त्यांनी सांगितले.

 आंदोलनात युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन शेख, पंकज चौधरी, सरचिटणीस अब्दुल समद, अजय मिश्रा, अमनदीप सैनी, तेजस चांदुरकर, दक्षिण मुंबई युवक जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, दक्षिण मध्य मुंबई युवक जिल्हाध्यक्ष फरहान मन्सुरी आदी उपस्थित होते. (Youth Congress protest)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर