करवीरनिवासिनी अंबाबाईची वैष्णवी रुपात अलंकार पूजा

Worship of Karveer-nivasini Ambabai in the 'Vaishnavi' form

कोल्हापूर : प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज शनिवारी करवीर निवसिनी अंबाबाईची वैष्णवी रुपात अलंकार पूजा बांधण्यात आली. देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडल्याने काही काळ गर्दीचे व्यवस्थापन कोलमोडले होते. पण पाऊस थांबल्यानंतर भाविकांच्या रांगा व्यवस्थित लावण्यात आल्या. तसेच मंदिर परिसरातील सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्यात आले. (Worship of Karveer-nivasini Ambabai in the ‘Vaishnavi’ form)

आज अश्विनी सप्तमी तिथीला करवीर निवासिनी अंबाबाई वैष्णवी रूपात सजली आहे. वेष्णवी देवीची धार्मिक ग्रंथात अशी माहिती दिली आहे की, जगदंबेच्या अनेक रूपा पैकी महत्त्वाची रूपे म्हणजे अष्टमातृका. दुर्गा सप्तशतीतल्या कथेनुसार रक्तबीज दैत्याच्या वधासाठी तर शिवपुराणातल्या कथेचे नुसार अंधकासुराच्या वधासाठी सर्व देवांच्या शक्ती मूर्तीमंत स्त्री आकृती धारण करून प्रगट झाल्या.  ज्यामध्ये भगवान शिवाची माहेश्वरी,  कार्तिकेयाची कौमारी, इंद्राची इंद्राणी,  ब्रह्माची ब्राह्मी,  नरसिंहाची नारसिंही,  वराहाची वाराही या सगळ्यांबरोबर भगवान विष्णूंची मूर्तिमंत शक्ती अर्थात वैष्णवी प्रगट झाली.  देवीच्या हातातील शंख हे भगवान विष्णूंच्या नादब्रम्हाचे तर चक्र हे गतिमानतेचे प्रतिक आहे. गदा हे त्यांच्या क्रियाशक्तीचे तर पद्म हे त्यांच्या पालन तत्वाचे प्रतीक आहे.  वैष्णवीच्या पितांबराचा रंग अर्थात पिवळा रंग तिची निर्मितीसह पालनाची क्षमता दाखवतो. अशी ही भगवती वैष्णवी गरूडावर बसलेल्या रूपात विराजमान आहे.  (Worship of Karveer-nivasini Ambabai in the ‘Vaishnavi’ form)

Related posts

गोकुळमध्ये सतेज पाटलांनी विरोधकांना धुळ चारली

पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे इतिहास घडवणार;  मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास

अंबाबाईच्या जागरादिवशी  महिषासुरमर्दिनी रुपात पूजा