Woman dies in gas explosion : गॅस स्फोटात महिलेचा मृत्यू

Woman dies in gas explosion

कोल्हापूर : प्रतिनिधी : घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनमधून गॅस गळती होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी असेल्या महिलेचा उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. शीतल अमर भोजने (वय २९ )असे मृत्यमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.  कळंबा मध्यवर्ती कारागृह नजीकच्या एलआयसी कॉलनीतील मनोरमा नगरमध्ये सोमवारी रात्री घटना घडली होती. त्यामध्ये चौघे गंभीर जखमी होते. त्यापैकी शीतल भोजने यांचा मृत्यू झाला.  या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे. (Woman dies in gas explosion)

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीस असणाऱ्या एलआयसी कॉलनीतील मनोरमा नगरीत अमर  भोजने हे त्यांची पत्नी,वडील आणि दोन लहान मुलांसह राहतात. अमर भोजने हे शहरातील एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करतात. सोमवारी रात्री अमर भोजने हे कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी यांच्या घरी त्यांची पत्नी शीतल  मुलगा प्रज्वल, मुलगी इशिका आणि त्यांचे वडील अनंत भोजणे हे घरी होते. सोमवारी सायंकाळी भोजने यांच्या घरातील गॅस पुरवठा करणारी पाईपलाईनची जोडणी करण्यात आली होती. मात्र पुरवठा सुरू केला नव्हता. दरम्यान रात्री उशिरा भोजने यांच्या घरात अचानक स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता भोजने यांचा घरातील आगीचे लोळ घरासमोरील अन्य घरांमध्ये गेले. यावेळी भोजने यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या फर्निचर प्रापंचिक साहित्य आणि इतर साहित्याचे देखील अक्षरशः तुकडे झाले. या स्फोटामध्ये अनंत भोजने शितल भोजने यांच्यासह सहा वर्षांचा प्रज्वल भोजने आणि तीन वर्षाची इशिका भोजने ही मुलगी देखील भाजून जखमी झाली. शेजारी राहणाऱ्या लोकांनी अंगावर ब्लॅंकेट टाकून ही आग आटोक्यात आणली आणि भोजने कुटुंबीयांना उपचारासाठी दाखल केले. (Woman dies in gas explosion)

 दरम्यान पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असताना शितल भोजने यांचा मृत्यू झालाय. जखमी अनंत भोजने तसेच प्रज्वल आणि इशिका यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केलेत. दरम्यान गॅस जोडणी पूर्ण होण्याअगोदरच गॅसचा स्फोट कसा झाला? अशी विचारणा होत आहे.

आज सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.या घटनेत शीतल भोजने यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं ऐन सणासुदीच्या तोंडावर इशिका आणि प्रज्वल यांचे मातृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. (Woman dies in gas explosion)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर