विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान

Voting for 9 Legislative Council seats on May 12

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १२ मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

या निवडणुकीसाठी २३ रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. नऊ जागांसह एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. १३ मे रोजी विधान परिषदेतील नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उप सभापती निलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, राजेश राठोड हे आमदार निवृत्त होणार आहे. (Voting for 9 Legislative Council seats on May 12)

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या पारड्यात पाच जागा जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. महाविकास आघाडी एकच जागा जिंकू शकते. महाविकास आघाडीकडे असलेली एकमेव जागेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षामध्ये एकमत होण्याची शक्यता आहे. राज्यसभेवर शरद पवार पवार बिनविरोध असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट हा निवडणुकीसाठी आग्रही राहणार नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन पक्षापैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अतिरिक्त १३ मते आहेत. महायुतीने एक जादा उमेदवार दिला तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर होऊ शकते. (Voting for 9 Legislative Council seats on May 12)

दरम्यान प्रज्ञा सातव यांनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. सातव यांच्या आमदारकीची मुदत २७ जुलै २०३० पर्यंत आहे. (Voting for 9 Legislative Council seats on May 12)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर