Vishwkumar Ramesh : मी जिवंत कसा बाहेर पडलो ?

Vishwkumar Ramesh

नवी दिल्ली : अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या अपघातातून एकमेव वाचलेले विश्वकुमार रमेश यांनी शुक्रवारी डीडी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत, “मी कसा जिवंत बाहेर पडलो हे मलाच माहित नाही” अशी प्रतिक्रिया दिली. या अपघातात विमानातील २४२ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच विश्वकुमार रमेश यांची भेट घेऊन मोदींनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

अहमदाबाद सिव्हिलमधील हॉस्पिटलमधील भारतीय वंशाचे आणि ब्रिटीश नागरिक विश्वकुमार रमेश यांच्यावर उपचार सुरू आहेत. डी.डी.न्यूजला ते म्हणाले, “विमान उंची वाढवत नव्हते, फक्त सरकत होते आणि नंतर ते एका इमारतीवर आदळले आणि स्फोट झाला. “सर्व काही काही सेकंदात घडले. मला जाणवले की आपण खाली जात आहोत,” (Vishwkumar Ramesh)

विमानातून वाचलेले एकमेव रमेश हे  ११अ सीटवर खिडकीजवळ बसले होते. त्यांनी डीडी न्यूजला सांगितले की अपघातानंतर .”सुरुवातीला मला वाटले की मी मेलो आहे. नंतर मला जाणवले की मी अजूनही जिवंत आहे आणि माझ्या सीटजवळील फ्यूजलेजमध्ये एक छिद्र दिसले. मी स्वतःला बकल काढण्यात यशस्वी झालो. मी माझ्या पायाने ते छिद्र ढकलले आणि रेंगाळत बाहेर पडलो. माझ्या आजूबाजूचे काही जण मृत झाले होते. काही जखमी विव्हळत होते . मी कसा बचावलो हे मला अजूनही समजत नाही.”

अपघातस्थळावरील व्हिडिओ क्लिप्समध्ये विश्वकुमार रमेश  जखमी आणि सुन्न अवस्थेत  बाहेर पडताना दिसत होते आणि गुजरातीमध्ये ओरडत होते, “विमान फत्यो चे!” (विमानाचा स्फोट झाला).

त्यांनी अशी माहिती दिली की अपघातानंतर आपण वाचेन अशी शक्यता कमी होती. विमान वेगात धडकल्याने  ड्रीमलायनरचे मधला भाग तुटला आणि  आगीच्या ज्वाळा पसरल्या. स्फोटामध्ये  रमेश ज्या भागात बसला होते त्या भागाचे कमी नुकसान झाले, ज्यामुळे त्याला बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग मिळाला. ११जे मध्ये बसलेला त्याचा भाऊ अजयकुमार रमेश यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना त्यांच्या भावाचा मृत्यू झाल्याची माहिती नाही. (Vishwkumar Ramesh)

हॉस्पिटलमधील वॉर्ड बी ७ मधील अडमिट असलेले , त्यांच्याशी चर्चा करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला आणि नातेवाईकाला फक्त एकच गोष्ट विचारत आहेत “माझा भाऊ कुठे आहे?”.

त्या दिवशी सकाळी दोन्ही भावांना विमानतळावर घेऊन जाणारा कुटुंबातील मित्र अयुब मन्सुरी यांच्या मते, अपघातानंतर रमेशने तीन वेळा फोन केले आणि नंतर त्याचा फोन बंद पडला. “तो रडत राहिला आणि अजयला विचारत राहिला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे, भाजले आहे, पण तो कसा तरी त्या ढिगाऱ्यातून बाहेर पडला.”

गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास, सुरक्षा अधिकाऱ्यांनी रमेश हा एकमेव बचावलेला असल्याची ओळख पटल्यावर रुग्णालयातील वॉर्ड सील केला. गुजरात एटीएस आणि अहमदाबाद गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि तपासात मदत करण्यासाठी प्रवेश प्रतिबंधित केला आहे. (Vishwkumar Ramesh)

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !