मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचे एक्स हसबंड संजय कपूर यांचे वयाच्या ५३ वर्षी पोलो खेळताना हृदयविकाराने निधन झाले. एएनआय वृत्तसंस्थेने संजय कपूर यांचे व्यवसाय सल्लागार सुहेल सेठ यांनी कपूर यांच्या निधनाची पृष्टी केली आहे. संजय कपूर पोलो खेळत असताना चुकून मधमाशी गिळल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर ताबडतोब उपचार करण्यात आले पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. (Sanjay Kapur death)
संजय कपूर यांची गणना यशस्वी उदयोगपती म्हणून ओळख होती. त्यांच्या वडिलांचे नाव सुरिंदर कपूर असून आईचे नाव राणी कपूर आहे. कपूर यांची सोना ग्रुप ही प्रसिद्ध कंपनी असून ऑटोमोटिव्ह पार्टस् बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. २००३ मध्ये संजय कपूर अधिकृतपण वडिलाच्या कंपनीत सहभाग झाले. ऑटामोटिव्ह जगात कंपनीचे नावलौकिक वाढवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती.
संजय कपूर यांचे वैयक्तिक जीवन
व्यवसायात ठसा उमटवणाऱ्या संजय कपूर यांचे तीन विवाह झाले आहेत. त्यांचा पहिला विवाह मुंबईतील फॅशन डिझाएनर नंदिता महतानीशी यांच्याशी झाला. २००० मध्ये ते विभक्त झाले. (Sanjay Kapur death)
संजय कपूर यांनी २००३ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याशी विवाह केला. या जोडप्याला दोन मुले होती. समायरा मुलीचे नाव असून मुलाचे नाव कियान आहे. २०१६ मध्ये संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाने अनेकांना आश्यर्च वाटले. संजय आणि करिश्मा दोघेही मुलांचे अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करत होते.
करिश्मा कपूर यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला. प्रिया हे भारतीय मॉडेल आणि उद्योजिका आहेत. प्रिया सचदेव यांचा हा दुसरा विवाह होता. त्यांचा पहिला विवाह हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवाल यांच्याशी झाला होता. तिला सफिरा चटवाल ही मुलगी होती. संजय कपूर यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांना अझारियस हा मुलगा झाला. (Sanjay Kapur death)