V. Narayanan: भारताच्या सुरक्षिततेसाठी १० उपग्रह कार्यरत

V. Narayanan

इम्फाळ : भारताच्या सुरक्षिततेसाठी किमान १० उपग्रह कार्यरत आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली. पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी इस्त्रोने केलेल्या प्रयत्नांवर नारायणन यांनी प्रकाश टाकला. (V. Narayanan)

ते म्हणाले की, देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी किमान १० उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत.

इम्फाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या (सीएयू) ५ व्या दीक्षान्त  समारंभाला संबोधित करताना, इस्रो प्रमुखांनी पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. (V. Narayanan)

‘‘देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक उद्देशाने किमान १० उपग्रह अहोरात्र काम करत आहेत,’’ असे ते म्हणाले.

‘‘आपल्या सर्वांना आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती आहे. आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल. आपल्याला आपल्या ७,००० किमी समुद्रकिनाऱ्यावरील भागांचे निरीक्षण करावे लागते. आपल्याला संपूर्ण उत्तर भागाचे सतत निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही,’’ याकडे व्ही. नारायणन यांनी लक्ष वेधले. (V. Narayanan)

गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमा (आयबी) भागात चकमक आणि गोंधळामुळे रात्री जागून काढाव्या लागल्या. मात्र ११ आणि १२ मे च्या मध्यरात्री या प्रदेशात मोठ्या प्रमाणात शांतता होती, असे लष्कराने म्हटले आहे.

लष्कराच्या म्हणण्यानुसार, जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात शांतता होती. युद्धबंदीच्या उल्लंघनाची कोणतीही घटना घडली नाही.

२२ एप्रिल रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील प्रमुख दहशतवादी स्थळे उद्ध्वस्त करणाऱ्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार, जोरदार तोफांचा मारा आणि ड्रोन हल्ले केले. त्यानंतर अलिकडच्या काही दिवसांत ही पहिलीच शांत रात्र होती, असे लष्कराने नमूद केले. (V. Narayanan)

गेल्या काही दिवसांपासून, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमधील सीमावर्ती भागात पाकिस्तानने जोरदार गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. प्रदेशातील शांतता भंग करणे होता, या मागचा कट होता. तथापि, भारतीय हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानकडून होणारे हल्ले मोठ्या प्रमाणात निष्प्रभ करण्यात आले.

प्रत्युत्तरादाखल, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील ११ हवाई तळ उद्ध्वस्त केल्याची पुष्टी केली आणि त्यांच्या लष्करी क्षमतेचे मोठे नुकसान केले. रविवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत, लेफ्टनंट जनरल राजीव घई (महासंचालक लष्करी ऑपरेशन्स), व्हाइस अॅडमिरल ए.एन. प्रमोद (महासंचालक नौदल ऑपरेशन्स) आणि एअर मार्शल ए.के. भारती (महासंचालक हवाई ऑपरेशन्स) यांनी संयुक्तपणे भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे प्रमुख परिणाम उघड केले.

हेही वाचा :
युद्ध म्हणजे सिनेमा नव्हे
भारतातील ३२ विमानतळे पुन्हा सुरू होणार

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या